
इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ भंडारा प्रतिनिधि
भंडारा :आम. नरेंद्र भोंडेकर यांनी आपल्या जन्मदिना निमित्त आरोग्य संकल्प अभियानास सुरुवात केली होती आणि त्याला भारी प्रतिसाद मिळात आले आहे. त्या वेळी हा अभियान पुढे असाच सुरू ठेऊन गरजूंना निःशुल्क उपचार व ट्रायसिकल वितरण करीत राहू असे वचन आम. भोंडेकर यांनी दिले होते. ते वचन पूर्ण करीत प्रती वर्षा प्रमाणे या वर्षी सुद्धा 26 जूनला आपल्या जन्मदिनाचे अवचित्य समोर ठेवून आम. भोंडेकर यांच्या द्वारे महारोग शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित करून, दिव्यांग व्यक्तींना ट्रायसिकल वितरित करण्यात येणार आहे.
पेस हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पेस आयुर्वेदिक रुग्णालय, शासकीय रुग्णालय भंडारा व शालिनीताई मेघे हॉस्पिटल व रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आम. नरेंद्र भोंडेकर यांच्या वाढदिवसा निमित्त येत्या 26 जूनला भव्य रोग निदान शिबिर व रक्त दान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या वर्षी हे शिबिर सिर्सी भोजराज भोंडेकर आयुर्वेदिक महाविद्यालय च्या भव्य आवारात घेण्यात येणार आहे. या शिबिरात डॉक्टरांच्या विशेष चमू द्वारे रुग्णांची तपासणी केली करून त्यांना आवश्यक प्राथमिक औषधी वितरण करण्यात येणार आहे. या शिबिरात मेडिसीन तज्ञ, हृदयरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, सर्जरी तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, अस्थी रोग तज्ञ, त्वचा रोग, बाल रोग, कान नाक घसा, श्वसन रोग, मानसिक रोग, न्यूरो सर्जन, दंत व मुख रोग, युरो तज्ञ, फिजियो थेरपी तज्ञान सह आयुर्वेदिक औषधोपचार द्वारे रुग्णांची तपासणी करून तांच्यावर उपचार करतील. शिबिरात येणाऱ्या ज्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करणे गरजेचे असेन त्यांच्यावर विविध योजने मार्फत शस्त्रक्रिया केली जाईल.
दिव्यांग व्यक्तींना ट्रायसिकल चे वितरण
या शिबिर दरम्यान जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना आम. नरेंद्र भोंडेकर यांच्या विकास निधीतून ट्रायसिकल वितरित करण्यात येणार आहे. यात जी दिव्यांग व्यक्ति योजनेच्या नियमात बसतात त्यांना बॅटरी वर चालणारी ट्रायसिकल आणि अन्य व्यक्तींना संधि ट्रायसिकल वितरित करण्यात येईल. या शिबिराचा लाभ घेण्या करीता जिल्ह्यातील रूग्णांनी शिबिर दरम्यान आपली नोंदणी करून घेणे आवश्यक असून या शिबिराचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा ही असे आवाहन आयोजकांनी केले आहे.





Total Users : 883108
Total views : 6488546
