
तुमसर: शहर मध्ये व देव्हाडी गावामध्ये मिळून चार दिवसात 14 दुकाने चोरांनी फोडली होती.रेती तस्करीच्या रोजच्या रोज पाच महिन्यापासून उत्पात सुरू आहे. बिना नंबरचे प्लेट लावून रेतीचे टिप्पर खुलेआम शहरात जात आहे. सट्टा बाजाराच्या उत्पात ,मोटरसायकल चोरीच्या उत्पात सुरू आहे,हे बघता तुमसर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड हे निष्क्रियता सामोर आली आहे.यांना त्वरित तुमसर पोलीस स्टेशन मधून हटवा अन्यथा 15 दिवसा नंतर मोठे आंदोलन करू असे चेतावणी निवेदन मनसेचे पदाधिकारी संघटक प्रमुख अश्विन देशमुख यांनी दिले आहेत. याबाबतीत गंभीर विचार व्हायला हवे अन्यथा होणारे नुकसान चे जबाबदार गृह खाते राहील असे मनसेचे पदाधिकारी चे म्हणणे आहे . हि माहिती मनसेचे संघटक प्रमुख अश्विन देशमुख यांनी प्रत्यक्ष मला भेट देऊन माहिती दिली आहे.





Total Users : 883212
Total views : 6488681
