
कु.चेतना राजेंद्र तिडके यांची एन.एफ.एस. यु.,भारत सरकार या पदावर उपकुलसचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.कुमारी चेतना राजेंद्र तिडके राहणार मनोरा,जिल्हा भंडारा या राष्ट्रीय न्यायालयिक विज्ञान विश्वविद्यालय,(नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी) गृहमंत्रालय,भारत सरकार,नवी दिल्ली येथे सहाय्यक कुलसचिव या पदावर कार्यरत होत्या.परंतु त्यांच्या कामाची शैली व गुणवत्ता पाहुन नुकतीच नागपूर येथे स्थापन झालेली नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी,भारत सरकार,नागपूर येथे कुमारी चेतना राजेंद्र तिडके रा.मनोरा, जि.भंडारा याना उपकुलसचिव या पदावर पदोन्नती देऊन मोठी कामगिरी भारत सरकारने त्यांच्यावर सोपविली आहे.त्याबद्दल जैन कलार समाज व महाराष्ट्र कलाल-कलार समाज संघटने तर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.





Total Users : 883092
Total views : 6488527
