
तुमसर:तुमसर तहसील कार्यालयात गेल्या अनेक महिन्यापासून तत्कालीन तहसीलदार यांच्या निलंबन झाल्याने हे पद रिक्त होते त्यांनतर प्रभारी तहसीलदार म्हणुन नायब तहसीलदार यांच्या वर हे भार सोपविण्यात आले दरम्यान च्या काळात महिन्या भरा आधी 1 जून 2025 ला शासन आदेश आला ज्यामध्ये तहसीलदार म्हणुन गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा येथील तहसीलदार नरसय्या मृत्यालू कोंडागुर्ले हे रुजू होणार असे. आज जवळपास महिना लोटला पण अजूनही नवनियुक्त तहसीदार हे रुजू न झाल्याने नागरिकांमध्ये चर्चा आहे कि हे शासन आदेशाची पायमल्ली तर नाही न. एखाद्या अधिकारीची जर बदली झाली व त्याला नवीन ठिकाणी रुजू व्हायचे असेल तर जवळपास 7 दिवसात रुजू होणे अपेक्षित असते पण इथे महिना लोटला आणि नवनियुक्त तहसीलदार हे रुजू न झाल्याने नागरिकांमध्ये चर्चा रंगू लागली आहे.
आश्विन देशमुख संघटक प्रमुख मनसे





Total Users : 883190
Total views : 6488658
