
तुमसर : विनोबा नगर कोर्टाजवळील सिमेंट रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. याकडे वारंवार लक्ष वेधूनही नगरपरिषद दुर्लक्ष करीत आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) भंडारा जिल्हा सचिव मेहताब सिंग ठाकूर यांनी व्यक्त केली. रस्ता तात्काळ दुरुस्त न केल्यास नगरपरिषदेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. भविष्यात अपघात झाल्यास संपूर्ण जबाबदारी नगरपरिषद प्रशासनाची राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रमोद घरडे, अनिल जीभकाटे, राजेंद्र तुरकर, विजय रहांगडाले, हेमंत मलेवार, सागर बिसने, सोहनलाल हट्टेवार आदी पदाधिकारी उपस्थित होते!





Total Users : 883187
Total views : 6488655
