
तुमसर: दुर्गा श्रीराम नगर येथील ओपन जिम मैदानात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी भारत सरकारने आई तुझ्या नावाने एक झाड हा उपक्रम तुमसर येथील शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस एपी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण आयोजित करण्यात आला.
. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी “आई तुझ्या नावाने एक झाड” लावण्याचे आव्हान केले हा उपक्रम मर्यादित नसून निसर्ग बद्दल प्रेम आणि जबाबदारी चा प्रतीक व आई व मातृ निसर्गाप्रती कृतज्ञतेचे प्रतीक ठरेल.
. या उपक्रमात दहा कोटी झाडांची रोपटी लावली जाणार असे आव्हानाला प्रतिसाद देऊन शहर महिला काँग्रेसने ओपन जिम मैदानात विविध प्रकारची झाडांची रोपटे जसे बादाम,अशोक,निंब, आंबा,पिंपळ, वड, इत्यादी प्रकारची झाडांची रोपे लावण्यात आली.
. सदर कार्यक्रमाला तुमसर शहरमहिलां अध्यक्ष पमा ठाकूर,l सरोज भुरे जिल्हा उपाध्यक्ष,नेहा मोटघरे शहर सचिव, मीना गाढवे माजी नगरसेविका, जयश्री गबने उपाध्यक्ष, नंदा डोरले शहर उपाध्यक्ष, पुनम पाठक शहर महासचिव व महिला कार्यकर्त्यांच्या उपस्थित संपन्न झाला.





Total Users : 883187
Total views : 6488655
