
तुमसर: मोहाडी तालुक्यातील अनेक शेतकरी बोनस च्या प्रतीक्षेत शासनाने शेतकऱ्याच्या अंत पाहू नये तत्काळ शेतकऱ्यांना बोनस ची रक्कम अदा करावी – तुमसर शहर मनसे तुमसर: गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी हा बोनस च्या प्रतीक्षेत असून शासनाने शेतकऱ्यांची थट्टा चालवली का? असा प्रश्न तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना पडला आहे. शेतकरी बळीराजा हा आधीच निसर्गाच्या प्रकोपामुळे हवालदिन झाला आहे. आणि दुसरी कडे त्या अन्न दात्या बळी राजाला त्याच्या हक्काच असलेल्या बोनस शासन अद्याप देत नसल्याने त्याला आर्थिक मानसिक ताण सोसावं लागत असून जर शेतकऱ्यांनी करावे तरी काय अश्या एक ना अनेक प्रश्न त्याला सतावतो आहे. तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमसर च्या वतीने शासनास विनंती आहे कि शेतकऱ्यांच्या संयमाच्या अंत पाहू नये व तत्काळ बोनस त्यांच्या खात्यावर जमा करावे अन्यथा शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी मनसे रस्त्यावर उतरेल आणि समोर जे काही कायदा सुव्यस्था बिघडेल त्याची सर्वस्वी जवाबदारी शासनाची राहील.





Total Users : 883090
Total views : 6488524
