
भंडारा जिल्यातील मोहाडी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांब येथे शाळेतील माजी विद्यार्थी रश्मीत रामटेके यांनी मुलीच्या दुसऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध वृक्ष भेट देऊन वृक्षारोपण केले. त्यात विशेष म्हणजे फक्त झाड लावून चालणार नाही तर विद्यार्थ्यां बरोबर वृक्षांची उन्नती व्हावी अशी भूमिका मांडत झाडाचे पालकत्व स्वीकारले. मुलीच्या संगोपनासह झाडाचेही संगोपन करू असे त्यांनी सांगितले, माजी विद्यार्थ्यांच्या हा उपक्रम आणि झाडाचे पालकत्व स्वीकारण्याच्या निर्णयाने अनेकांनी प्रेरणा घ्यावी असा हा वृक्ष लागवडीचे उपक्रम पार पडला शाळेतील विद्यार्थी कुठेही गेला कोणतीही पदवी घेतली तरी ज्या मूळ शाळेत त्यांनी शिक्षण घेतला ज्या शाळेपासून प्रथमता सुरुवात झाली शिक्षणाची त्या शाळेला कधीही विसरू नये असे सांगत रश्मीत रामटेके यांनी मुलीच्या नावाने मुलीच्या दुसऱ्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध वृक्षांची लागवड केली.
झाडांची लागवड करून झाड मोठे व्हावे शिक्षणा बरोबर, शालेय आहराबरो सोबतच शाळेतील विद्यार्थ्यांना निसर्गाच्या रुपात चांगले ऑक्षिजन, शुद्ध हवा, झाडांची सावली घेता येईल हा या वृक्षारोपण मागचा महत्त्वाचा उद्देश आहे. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांब येथील मुख्याध्यापिका सौ. स्वाती होळंबे मॅडम, शिक्षिका सौ. मंगिता लिल्हारे मॅडम,सौ. खंडाळे मॅडम, मदतनीस सौ.तितीरमारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांब येथील शाळा समितीचे अध्यक्ष शेखर उताणे, रश्मीत रामटेके पल्लवी रामटेके, शौर्यमित्र बहुद्देशीय संस्था जांब चे मयुर कुथे शाळेतील विद्यार्थी,विद्यार्थिनी आदी उपस्थित होते.






Total Users : 883186
Total views : 6488654
