
तुमसर : राज्य शासनाच्या १०० दिवस रुग्णालयीन व कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिम-२ ही राज्य विभाग, जिल्हा व तालुका स्तरावरुन एकूण १२५०० शासकिय कार्यालयामध्ये यशस्वीपणे राबविण्यात आली त्याअंतर्गत सुभाषचंद्र बोस शासकिय उपजिल्हा रुग्णालय तुमसर जि भंडारा रुग्णालयाचे नागपूर विभागातून तृतीय क्रमांक मिळविला. स्वातंत्र्यदिनी भंडारा जिल्हाचे पालकमंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते वैद्यकिय अधिक्षक, डॉ. नितीन हरीदास मिसुरकर यांना मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सहीचे प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
जुन महिन्यापासून राज्य शासनाच्या वतीने कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेचा दुसरा टप्पा राबविण्यात आला होता. नागपूर प्रादेशिक विभागातून या मोहिमेचे पडसाद दिसून आले आणि संपूर्ण राज्यभरात यांची अंमलबजावणी झाली. तपासणी प्रथकाने विविध रुग्णालयीन विभागामध्ये भेट देवून सर्व कार्यालयीन बाबीची पाहणी करुन, रुग्णालयात दाखल रुग्णांची स्वतः रुग्णालयीन पुरविण्यात येणा-या सोयी सुविधेबाबत विचारणा करुन तसेच कार्यालयीन रेकार्ड तपासून सुभाषचंद्र बोस, उपजिल्हा रुग्णालय तुमसर जि. भंडारा रुग्णालयाची निवड केली. मोहिमेत राज्यातील १२५०० विभागांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये सदर रुग्णालयांचे तृतीय क्रमांक मिळाल्याची कार्याची दखल म्हणून स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मा.डॉ. दिपचंद सोयाम, जिल्हा शल्यचिकित्सक, सामान्य रुग्णालय भंडारा यांचे मार्गदर्शनातून तसेच डॉ. नितीन हरीदास मिसुरकर, वैद्यकिय अधिक्षक यांनी दिलेला सुचनेनसार रुग्णालयीन प्रत्येक विभागातून राज्य शासनाच्या १०० दिवस रुग्णालयीन व कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिम-२ मध्ये सुधारणा करण्याबाबात प्रत्येक विभागाने केलेल्या प्रत्यनाचे यश म्हणून सुभाषचंद्र बोस, शासकिय उपजिल्हा रुग्णालय, तुमसर जिल्हा भंडारा तृतीय क्रमांक गौरविलेला आहे.





Total Users : 883186
Total views : 6488654
