
भंडारा : जीवनाच्या कोणत्याही परीस्थित परिवाराला सांभाळू शकते ती स्त्री आहे. कारण देवानी स्त्रीला एका शक्ती च्या रुपात जन्म दिला असून साधारण दिसणारी स्त्री आवश्यकता पडल्यास चंडीचा रूप धारण करू शकते. म्हणून स्त्री ने कधीच स्वतः ला कमजोर समजण्याची चूक करू नये. असे विचार डॉ अश्विनीताई भोंडेकर यांनी व्यक्त केले. त्या शिवसेनेच्या महिला मेळावा व रक्षाबंधन कार्यक्रमास संबोधित करीत होत्या. कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून आम. नरेंद्र भोंडेकर यांची उपस्थिती होती.

रक्षा बंधनचे अवचीत्य साधत शिवसेनेच्या महिला बूथ प्रमुख व सह बूथ प्रमुखांच्या मेळाव्याचे आयोजन येथील मंगलमुर्ती सभागृहात करण्यात आले. या वेळी बोलतांना डॉ अश्विनीताई भोंडेकर पुढे म्हणाल्या कि आमदार झाल्या पासूनच नरेंद्र भोंडेकर यांनी विधान सभेच्या विकास बद्दल जितका विचार केला तेवढाच विचार महिलांच्या उत्थाना करिता करीत असतात. महिलांकरिता येणाऱ्या योजना अधिकाधिक महिलां पर्यंत कश्या पोहोचविता येतील या करिता त्यांची स्वतःची यंत्रणा कामाला लागली असते. ते नेहमी म्हणतात कि माझ्या बहिणी जो पर्यंत सुख नाही तो पर्यंत मी कसा सुखी होणार. या करिता महिलांच्या मदतीला धावण्यास ते कधीच मागे राहत नाही. कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून उपस्थित आम. नरेंद्र भोंडेकर यांनी संबोधित करतांना सांगितले कि भंडारा विधानसभेचा विकास आणि महिलांना सुख सुविधा मिळवून देण्या करिता त्यांनी आपले जीवन समर्पित केले आहे. नगर परिषदेत दिसते कि महिलांना आपल्या कामा करिता दिवस दिवस भर रांगेत उभे राहावे लागते परंतु नगर परिषदे च्या या कामांकरिता अशी योजना आखली जाणार आहे कि ज्या प्रमाणे कर वसुली करिता नगर परिषद चा कर्मचारी तुमच्या दारावर येतो त्याच प्रमाणे नगर परिषदेतून मिळणारे दाखले नगर परिषदेचा कर्मचारीच तुमच्या घरी पोहोचविणार. परंतु त्या करिता तुम्हा बहिणींची साथ येत्या काळात लागणार आहे. कार्यक्रमा दरम्यान भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या सौ अशा गायधने यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. ज्या नंतर कार्यक्रमात उपस्थित भगिनींनी आम. नरेंद्र भोंडेकर यांना राखी बांधून शुभेच्छा देल्या. या वेळी लोकसभा संपर्क प्रमुख संजय कुंभलकर, जिल्हा प्रमुख अनिल गायधने, महिला जिल्हा प्रमुख सविता तुरकर, उप जिल्हा प्रमुख सुरेश धुर्वे, शिवसेना नेते प्रकाश मालगावे, मागास वर्गीय सेनेचे जिल्हा प्रमुख दीपक गजभिये, शालिनीताई नागदेवे, रत्नमाला वैद्य, शमीम शेख, वंदना घाडगे, आशा गेरीपुंजे, विद्या मेहर, पूजा कुंभलकर सह सर्व शिवसेना पदाधिकारी उपस्तीत होते.





Total Users : 883106
Total views : 6488544
