भंडारा : नगर परिषद क्षेत्र अंतर्गत च्या एकूण १६४०० घरांचे सर्वे करण्यात येणार असून या हा सर्वे तब्बल ११२ वर्ष नंतर करण्यात येणार आहे. या सर्वे करिता लागणारा अंदाजित खर्च तीन कोटी ४० लक्ष इतका असून नगर परिषद भंडारा द्वारे तत्काळ एक कोटी रुपये भरून सर्वे सुरु करण्याचे निर्देश आज आम. नरेंद्रे भोंडेकर यांनी दिले. आज भंडारा नगर परिषद येथे आम. भोंडेकर यांच्या द्वारे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ज्या दरम्यान त्यांनी तत्काळ सर्वे सुरु करण्याचे निर्देश दिले.
उल्लेखनीय आहे कि भंडारा नगर परिषदेच्या क्षेत्रांतर्गत १९१२ साली सर्वे करण्यात आला होता. इंग्रज काळात झालेल्या सर्वे नंतर या क्षेत्राचे सर्वे न झाल्या मुळे नगर परिषद क्षेत्रांतर्गत १६४०० परिवार नगर परिषदेच्या हद्दी बाहेरच आहेत. ज्या मुळे आजही वरील सर्व निवासी हे अतिक्रमण धारक म्हणविले जात आहे. अश्यात आज आम. नरेंद्र भोंडेकर यांच्या द्वारे विविध विषयांवर आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत या विषयावर गांभीर्याने चर्चा करण्यात आली. ज्यात वरील माहिती समोर आली. नगर परिषद मुख्याधिकारी यांनी माहिती देतांना सांगितले कि भंडारा नगर परिषद हद्देतील पिंगलाई येथील ३२००, गणेशपूर चे ५०००, केसलवाडा चे १२०० व भंडारा खास येथील ७००० असे एकूण १६४०० घरांचे सिटी सर्वे होऊ शकले नाही. ज्या करिता लागणारा निधी हा कमी पडत आहे. अश्यात आम. नरेंद्र भोंडेकर यांनी या कामा करिता लागणारे तीन कोटी ४० लक्ष पैकी एक कोटी रुपये नगर परिषदेच्या निधीतून भरण्याचे निर्देश देत सिटी सर्वे तत्काळ सुरु करण्यास सांगितले. सोबतच उरलेला दोन कोटी ४० लक्ष रुपयांचा निधी हा वैश्ष्ट्य पूर्ण योजनेतून भरण्या करिता प्रस्ताव सादर करण्यास सांगितले. या सर्वे नंतर जे परिवार गेल्या अनेक वर्षा पासून नझुल च्या जागेवर अतिक्रण करून बसले आहेत त्यांचा मार्ग मोकळा होऊन त्यांना त्या जागेचा मालिकांना हक्क मिळू शकेल. इतकेच नाही तर कितेक परिवारांना घरकुल योजनेचा लाभ सुद्धा मिळू शकेल. वरील बैठकीत शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल गायधने, लोकसभा संपर्क प्रमुख संजय कुंभलकर, मागास वर्गीय सेना चे जिल्हा प्रमुख दीपक गजभिये, शहर प्रमुख राजेश चोपकार, माजी नगर सेवक नितीन धकाते, बंटी मिश्रा सह सर्व पदाधिकारी व विभाग प्रमुख उपस्थित होते.





Total Users : 883090
Total views : 6488524
