
भंडारा: संगणक शिक्षण क्षेत्रात स्थानिक पातळीवर उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या “गुडलक कम्प्यूटर क्लासेस” या संस्थेने आणखी एक नवा टप्पा गाठला आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी भारतातील टॉप 100 संगणक प्रशिक्षण संस्थांमध्ये संस्थेची निवड झाली असून, संस्थेला “India’s Top 100 Institute” हा राष्ट्रीय बहुमान प्राप्त झाला आहे.
हा मानाचा पुरस्कार नागपूर येथे झालेल्या भव्य सोहळ्यात, सन 2004 मध्ये फेमिना मिस इंडिया वर्ल्ड ख़िताब जिंकलेली नामांकित सिने अभिनेत्री सायली भगत, तसेच AICPE नागपूर चे डायरेक्टर श्री. शरद तावोरी व सौ. कविता तावोरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ही यशकथा गुडलक कम्प्यूटर क्लासेससाठीच नव्हे, तर संपूर्ण भंडारा जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे.





Total Users : 883092
Total views : 6488527
