
मोहाडी: ग्रा. प. कार्यालय निलज खुर्द पं. स. मोहाडी अंतर्गत पांदन रस्त्याचे मातीकरण मुरूम खडीकरण वित्कृष्ट दर्जाचे तसेच खोटे मस्टर काढल्याने दि. १८/०८/२०२५ ला दिलेली तक्रार व दिनांक ०३/०९/२०२५ ला पत्रकार परिषद मध्ये दिलेल्या अनुषंघाने तक्रारीचे कोणतेही चौकशी झाली नसून दोषीवर काहीच कार्यवाही झाली नसल्याने तक्रार करते १ ते ५ पं. स. कार्यालय मोहाडी पुढे आत्मदहन करणार.
१५/०९/२०१५ सात दिवसाच्या आत कार्यवाही न झाल्यास दिनांक २२/०९/२०२५ रोज सोमवार सकाळी १२.३० वाजता स्थळ पं. स. कार्यालय मोहाडी समोर आत्मदहन करण्याचा इशारा.जिल्हाधिकारी यांना निवेदणातुन देण्यात आलाआहे.
सदर काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले गेले असून अंदाज पत्रकाप्रमाणे माती मुरूम टाकणे, रोलर ने दबाई करणे गिट्टी टाकणे पुन्हा मुरूम टाकणे व पुन्हा गिट्टी मुरूम रोलर ने दाबणे असे केलेलं नाही. तसेच गावकरी मजुराच्या खालावली परिस्थितीला तसेच भूमिहीन असणारे, मोल मजुरी करणारे यांचे कोणतेही विचार न करता JCB ट्रॅक्टर ने मुरूम टाकण्यात आले आहे. खडीकरण गिट्टी घोटाई असे काहीच काम न करता गावातील बाहेर असणारे विद्यार्थी कंपनीत कामावर असलेले नागरिक बाहेर काम करणारे जवडच्या संबंधितांपैकी व्यक्तीचे मजूर म्हणून खोटे हजेरी पत्रक मस्टर नोंदवून मजुरी रक्कम त्यांचे बँक खाते वर जमा करून परस्पर त्यांचे कडून रक्कम रोजगार सेविका सरपंच ग्रामसेविका तसेच ग्रा. पं. सदस्य/सदस्या यांनी त्यांच्या कडून आपल्याकडे परत मागविले आहे. निलज खुर्द येथील आम्हा मजुरांना काम न देता मोठ्या प्रमाणात मग्रारोहयो च्या कामात भ्रष्टाचार केला गेला आहे असे स्पष्ट दिसून येत आहे.
करिता सदर कामाची चौकशी करून भ्रष्टाचार करणारे रोजगार सेविका, तांत्रिक अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी यांच्यावर कठोर कार्यवाही करावी अशी मांगणी आम्ही निलज खुर्द ग्रामवासी करीत आहोत.जर शासनाने कोणतीही आतापर्यंत निवेदनाची दखल घेतली नाही. आणि येत्या 22सप्टेंबर पर्यंत दखल घेण्यात आली नाही तर सदर प्रकरणात तक्रार कर्ते पंचायत समिती मोहाडी समोर आत्म दहन करण्याचा जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.





Total Users : 883178
Total views : 6488644
