
तुमसर: दिव्यांग बांधवांना खारीच्या वाटयाने का होईना पण लाभ पोचवता यावा या भावनेतून व मा.श्री. परिणयजी फुके यांच्या मार्गदर्शनातून छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान,तुमसर, इनाली फाऊंडेशन पुणे व बसस्थानक तुमसर च्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्याग बांधवांना मोफत कृत्रिम इलेक्ट्रॉनिक हात प्रत्यारोपनाचे दोन दिवसीय शिबिर दिनांक 27 व 28 सप्टेंबर रोज शनिवार अणि रविवार ला आयोजित करण्यात आले होते. त्या अंतर्गत दिनांक 27 व 28 ला एकूण 63 दिव्यांग बांधवांची नोंदणी करण्यात आली व त्यापैकी 57 जणांना कृत्रिम हात प्रत्यारोपित करण्यात आले व उर्वरित हातांचे माप घेऊन पुढे त्यांना ते देण्यात येतील. उल्लेखनीय म्हणजे या शिबिरात कोलकाता (बंगाल राज्य), मोहाड ( मध्य प्रदेश) ,कोल्हापूर, यवतमाळ,अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, पवनी येथील दिव्याग बांधवांनी शिबिरात हजेरी लावली. जिथे येथील लोकांना आरोग्य सेवेसाठी नागपूर, पुण्या, मुंबई सारख्या मोठ्या शहरात जावे लागते तर “आरोग्यसेवा आपल्या दारी” हे ब्रीद सार्थक करत *छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान मार्फत तुमसर* येथील बस स्थानकावर करण्यात आली. व याचा लाभ परिसरातील तसेच दूरवर असणार्या बांधवांना सुद्धा घेता आला हे प्रतिष्ठान करीता अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. कृत्रिम हात प्रत्यारोपणासह शिबिरात नेत्रतज्ज्ञ डॉ. कुकवास यांच्या सहकार्याने मोफत नेत्रतपासणी व मोफत चष्मे वितरित करण्यात आले व दंततज्ञ डॉ.तृषाली तिडके यांच्या माध्यमाने मोफत दंत तपासणी, निदान व औषधोपचार रुग्णांना देण्यात आले या आरोग्य सेवेचा जवळपास 450 प्रवासी बांधवांनी लाभ घेतला कार्यक्रमाचे उद्घाटन तुमसर पोलिस स्टेशन चे निरीक्षक गायकवाड सर, जी. प.सदस्य दिलीपभाऊ सार्वे, आशिष कुकडे, प्राचार्य राहुल डोंगरे सर, शोभाताई लांजेवार, अशोकला चौधरी, कुंदाताई वैद्य व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत झाले तर नॅशनल प्रो कबड्डी स्टार आकाश पिकलमुंडे यांच्या हजेरीने तरुणांचा उत्साह वाढला होता. प्रस्तुत समयी छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठान तुमसर चे अध्यक्ष/ संस्थापक इंजि. नितीन धांडे प्रतिष्ठानचे सचिव प्रा.अमोल उमरकर ,उपाध्यक्ष विक्की साठवणे, कोषाध्यक्ष प्रतिक बुधे, संपर्कप्रमुख कोमल वानखेडे, सुमित जिभकाटे, नीतीन सार्वे, प्रशांत वासनिक, मनोज बोपचे, युवनेश धांडे, हैसीलाल ठाकरे, , अंकुश गभने, भूषण पडोळे, सोनू दुपारे, गीतेश गणोरकर, अंकित तुमसरे, तेजस श्रीरंग, यश चवळे, शुभम निमकर, कार्तिक डोये, साहिल धार्मिक, अनिकेत बोरकर, सतीश दमाहे, मयुर कुथे, नरेश तरटे, रणरागिनी कु. दिपाली मते, सायली मोहतुरे, प्रिया दुपारे, दामिनी धुमनखेडे, पूजा सिंगंजुडे, ज्योती हेडाउ, नेहा, नेहा ढबाले,खुशी भोयर, इत्यादींच्या सहकार्याने कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडला.





Total Users : 883068
Total views : 6488500
