
इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क प्रतिनिधि/ उप-संपादक/ डॉ. सुखदेव कटकर
गोंदिया: ताप्ती सेवा समिती गोंदिया तर्फे के टी एस जिल्हा सामान्य रुग्णालय कॅम्पस मध्ये नुकताच गांधी जयंती 2ऑक्टोबर 25रोजी राष्ट्रीय नशामुक्ति अभियान सप्ताह जनजागरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ताप्ती सेवा समिती चे संचालक श्री कालुराम अग्रवाल यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रीमती सुनीता अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली नशामुक्त गोंदिया ची शपथ घेण्यात आली. या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर तसेच टोबॅको फ्री गोंदिया च्या समुपदेशका संध्या शंभरकर डॉ मीनल वट्टी डॉ सुवर्णा उपाध्याय डॉ अनुराधा मुंढे सपना ठाकरे श्री क्षत्रिय श्री पंकज जैन आदी प्रामुख्याने उपस्थित होते या वेळी मार्गदर्शन करताना डॉ सुवर्णा हुबेकर यांनी आवाहन केले की महाराष्ट्र राज्य शासन आरोग्य विभागा तर्फे 2ऑक्टोबर पासून नशामुक्ति सप्ताह आयोजित करण्यात आला आहे त्या निमित्ताने ताप्ती सेवा समिती सोबत जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. युवकांनी व्यसनमुक्त जीवनशैली अंगीकार करावी असे आवाहन या प्रसंगी डॉ सुवर्णा हुबेकर यांनी केले
कार्यक्रम चे संयोजन दंत सहाय्यक श्री कोरे यांनी केले आभार प्रदर्शन श्रीमती निशा यांनी व्यक्त केले. उपस्थित रुग्णांनी व नागरिक यांना नशा मुक्ती बाबत चे आरोग्य माहिती पत्रके या वेळी वाटण्यात आली.ताप्ती सेवा समिती तर्फे केटीएस हॉस्पिटल कॅम्पस मध्ये रुग्णाच्या नातेवाईकांना दोन वेळा मोफत पौष्टिक जेवण निःशुल्क वितरित केले जाते.त्याच बरोबर विविध आरोग्य समस्या ओळखून त्यावर स्पेशालिस्ट डॉक्टरतर्फे मार्गदर्शन सुद्धा केले जाते. त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो.





Total Users : 883169
Total views : 6488634
