
तिरोडा: सेवा पंधरवडा उपक्रमाअंतर्गत गोरेगाव येथे आज आबादी जागेवर वास्तव्यास असलेल्या नागरिकांना शासनाच्या नियमांनुसार निशुल्क पट्टे वाटप करण्यात आले.त्यासोबतच सनद वाटप,विविध शासकीय दाखले, डीजीटल रेशन कार्ड, संजय गांधी श्रावण बाळ निराधार योजना,इतर विभागाचे लाभ वाटप आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमात आमदार मा.श्री विजय रहांगडाले यांच्या हस्ते लाभार्थ्यांना पट्टे प्रदान करण्यात आले. शासनाच्या जनकल्याणकारी धोरणांमुळे अनेक कुटुंबांना त्यांच्या निवासस्थानाचा कायदेशीर हक्क प्राप्त झाला आहे. या निर्णयामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, शासनाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.
या प्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष सीता रहांगडाले, बांधकाम सभापती डॉ.लक्ष्मण भगत, मा.जि.प.अध्यक्ष पंकज रहांगडाले, तहसीलदार प्रज्ञा भोकरे, प.स.सभापती चित्ररेखा चौधरी, उपसभापती रामेश्वर महारवाडे, प.स.सदस्य किशोर पारधी, सुप्रिया गणवीर, शीतल बिसेन, नलिनी सोनेवाने, मा.नगराध्यक्ष आशिष बारेवार,भाजप तालुकाध्यक्ष अनंता ठाकरे व मोठ्या संखेने लाभार्थी उपस्थित होते.





Total Users : 883068
Total views : 6488500
