
नगरधन (ता. रामटेक) – सांस्कृतिक परंपरा आणि लोककलेच्या साक्षीदार असलेल्या नगरधन गावात आजपासून मंडई उत्सवाची रंगतदार सुरुवात झाली आहे. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून गावकऱ्यांसह परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या मंडई उत्सवात स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळणार असून लोकनृत्य, नाट्यप्रयोग, कीर्तन, भजन, बालकलाकारांची सादरीकरणे यांसह विविध सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांमुळे गावाच्या सांस्कृतिक वैभवाला नवी झळाळी मिळेल, असा विश्वास ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. नगरधनच्या सरपंच माया अरुण दमाहे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “नगरधन हे ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध गाव आहे. या पारंपरिक मंडई उत्सवाच्या निमित्ताने गावकऱ्यांना एकत्र येण्याची, आपली कला आणि संस्कृती जपण्याची संधी मिळणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आम्ही करत आहोत.”
या उत्सवाच्या आयोजनासाठी ग्रामपंचायत, स्थानिक सामाजिक संस्था तसेच युवक मंडळांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. उत्सव काळात संपूर्ण गाव सजविण्यात आले असून, रोषणाईने नगरधन उजळून निघाले आहे.






Total Users : 883068
Total views : 6488500
