
भंडारा: लायन्स क्लब भंडारा सेंट्रल यांचे वतीने फंड रेजिंग बाबी करिता हास्य कवी संमेलनाचे आयोजन स्थानिक लल्ला सेलिब्रेशन स्टेशन रोड भंडारा येथे करण्यात आले होते.सदर हास्य कवि संमेलनास विविध ठिकाणाहून प्रसिद्ध हास्य कवी यांना बोलावण्यात आलेले होते. प्रा.मनिष बाजपेयी, हास्य कवी व मंच संचालक, नागपूर, आनंद राज आनंद हास्य कवी नागपूर, निरजव्यास हास्यकवी/व्यंगकार नागपूर, गीतकार/हास्यकवि संगीता सरल भोपाल, नेपाळचे लाफ्टर आर्टिस्ट कवी लक्ष्मण नेपाली यवतमाळ येथिल कवी कपिल जैन तसेच भंडारा येथील कवी ऋषिकेश ऋषी भारत यांनाही बोलावण्यात आलेले होते. सदर हास्य कवी संमेलन करिता लायन्स क्लब भंडारा सेंट्रल व त्यांचे टीमने अत्यंत चोख व्यवस्था केलेली होती. याकरिता सर्व सामान्यांना प्रवेश पत्र तसेच पत्रकार व मान्यवरांना व्हीआयपी पासेस उपलब्ध करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला लायन्स क्लबचे पदाधिकारी नागपूर येथील लॉ.टी.व्ही.श्रवण कुमार (MJF,PDG,PMCC), लॉ. निशिकांत प्रतापे,(MJF,PSTCo-Or.),लॉ. राजन गुप्ता(Ad.DCS), लॉ.हेमंत अडगावकर (DEdn.Co-Or.), इ.मान्यवर लाभले होते. सर्वप्रथम लायन्स क्लब भंडारा सेंट्रल चे अध्यक्ष लॉ.पंकजकुमार राजाभोज यांनी नागपूर येथील उपस्थित मान्यवरांना दीपप्रज्वलन करिता पाचारण केले, त्यानंतर कवी संगीता सरल द्वारे सरस्वती वंदना ने कवी संमेलनाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे मध्यंतरी सहकार्य करणाऱ्या प्रायोजक संस्था व उद्योजक यांना गुलदस्ता व सन्मान चिन्ह देऊन गौरवान्वित करण्यात आले, याप्रसंगी मान्यवरांनीही क्लबचे कार्यकर्त्यांना लायन्स पिन देऊन त्यांचा सन्मान केला. उपस्थित प्रेक्षकांना कार्यक्रमा नंतर चविष्ट भोजनाची पण व्यवस्था करण्यात आलेली होती.अंदाजे चारशेपन्नासहून अधिक उपस्थितांनी ह्या सुंदर व रंगतदार कार्यक्रमात खूप टाळ्या वाजवल्यात. व चविष्ट भोजनाचा आस्वाद घेतला. कार्यक्रम संचालन लायन मोहन नायर यांनी केले, आभार लायन शैलेश तिवारी यांनी मानले. सदर कार्यक्रमाला लॉ.रामबिलासजी सारडा, लॉ.हरीश मदान, लॉ.शरद बिजवे, लॉ.जयेश वनेरकर, लॉ.विशाल भोंगाडे, लॉ.प्रवीण पटेल, लॉ.कुमार नशीने, लॉ.शीतल नशीने, लॉ.अमित गुप्ता, चे विशेष सहकार्य मिळाले. एकंदरीत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अश्याच प्रकारे पुढेही लायन्स क्लबचे वतीने कार्यक्रम होणार असल्याचे समिती प्रमुख मार्फत सांगण्यात आले.








Total Users : 883068
Total views : 6488500
