
तुमसर: मॉईल लिमिटेडच्या अनुकंपा विषयी घेण्यात आलेल्या निर्णयाच्या विरोधात आणि अन्य मागण्यांना घेऊन सुरू असलेल्या तुमसर तालुक्यातील सितासावंगी येथील सरपंच श्री.प्रकाश धीकोडी बेमुदत आमरण उपोषण वर बसले आहेत या उपोषणाला आज तुमसर-,मोहाडी विधानसभा प्रमुख इंजी.प्रदीपजी पडोळे यांनी भेट देऊन मॉइल कर्मचाऱ्यांचा विषय लावून धरण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी मॉइलचे नागपूर येथील अधिकारी यांच्याशी चर्चा केली नोकरीत कार्यरत असताना कामगार किंवा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास अनुकंपा तत्वावर त्याच्या कुटुंबातील व्यक्ती नोकरी दिली जाते ही अनुकंपा पद्धत बंद करण्याचा निर्णय मॉईल प्रशासनाने घेतला. यासोबतच काही कंत्राटी पद्धतीने कामगारांना कमीत कमी वेतन सुद्धा देण्यात येत नसल्याने कंत्राटदारावर कठोर कार्यवाही करावी व मॉईल प्रशासनाच्या अन्य धोरणांच्या मागण्या जाणून घेतल्या. अनुकंपा पद्धत बंद करणे अन्याय आहे. आज अनेक कामगार काम करीत असताना विविध दुर्धर आजाराने ग्रस्त आहेत. त्यांच्या ठिकाणी कुटुंबातील सदस्यांना संधी देणे गरजेचे आहे पण प्रशासन या बाबत सकारात्मक नाही. अनुकंपा देताना ६ लाख वार्षिक उत्पनाची अट टाकण्यात आली आहे. ती योग्य नाही. अशा अनेक अडचणी यावेळी सांगण्यात आल्या. दरम्यान आंदोलकर्त्यांशी बोलून पडोळे यांनी मॉईल प्रशासनातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मागण्यांच्या दृष्टीने सकारात्मक तोडगा काढावा याबाबत चर्चा करण्यात आली अशा
स्थानिक पातळीवर न्याय मिळणार नसेल तर हा विषय मुंबई, दिल्ली पर्यंत नेवून कामगारांच्या हक्कासाठी लढा दिला जाईल,असेल आश्वासन प्रदीप पडोळे यांनी आंदोलनकर्त्यांना दिले.यावेळी उपोषण स्थळी तुमसर-मोहाडी विधानसभाचे आमदार श्री. राजुभाऊ कारेमोरे,नगरपरिषद तुमसर चे उपाध्यक्ष श्री.सचिन बोपचे, तोपलालजी रहांगडाले, सौ.प्रीतिताई सोनवाणे, उपसरपंच नदीमजी पाशा, प्रफुल्लजी गुप्ता,यांच्या सह उपोषणाला समर्थन करणारे इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते





Total Users : 895442
Total views : 6505858
