
मांगली (ता. तुमसर) येथील ओम साई बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या अंतर्गत कार्यरत साई नर्सिंग कॉलेज व साई कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून डॉ. कोडवानी तसेच अभियंता नितीन धांडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओम साई बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ. वंदना किशोर चौधरी होत्या. तसेच साई महाविद्यालय मांगली (तुमसर) चे प्राचार्य संदीप चामट, साई कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्राचार्या पायल डोंगरे यांनी कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लावली.
या विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक मॉडेल्स, आरोग्यविषयक प्रकल्प तसेच औषधनिर्मिती व आरोग्य सेवेशी संबंधित माहितीपूर्ण सादरीकरणे केली. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे व वैज्ञानिक दृष्टिकोनाचे उपस्थितांनी कौतुक केले. साई नर्सिंग स्कूलच्या ट्यूटर साक्षी मानापूरे, शुभम बांगरे भारती बिरनवारे, रेश्मा कटरे, आभा राऊत, स्नेहा पटले तसेच शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने करण्यात आला.





Total Users : 895442
Total views : 6505858
