
तुमसर: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व अर्थमंत्री मा. Devendra Fadnavis जी यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा संवेदनशील विचार करत महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. ३० सँटेबर २०२५ पर्यंत पात्र शेतकऱ्यांसाठी २ लाख रुपयांपर्यंत थकीत कर्जमाफी देण्याची घोषणा करण्यात आली असून “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना” राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांच्या आयुष्यात नव्या आशेचा किरण निर्माण होईल. शेतकऱ्यांच्या कष्टाचे मोल जाणून त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी घेतलेला हा निर्णय निश्चितच शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारा ठरेल.या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांच्या आयुष्यात नव्या आशेचा किरण निर्माण होईल. शेतकऱ्यांच्या कष्टाचे मोल जाणून त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी घेतलेला हा निर्णय निश्चितच शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारा ठरेल.शेतकरी कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल महाराष्ट्र सरकार चे मनःपूर्वक आभार …..
परंतु माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती आहे की सन २००५ पासून ते ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत जुने आणि नवीन २ लाखा पर्यंतचे हजारो शेतकरी बांधवांचे आतापर्यंत चे थकीत पीक कर्ज व थकीत पुनर्गठन पीक कर्ज बाकी आहेत या शेतकऱ्यांचेही पीक कर्जमाफीत नाव समाविष्ट करण्यात यावे व त्यांचीही कर्जमाफी करण्यात यावी ही आपणास नम्रपूर्वक विनंती..





Total Users : 895442
Total views : 6505858
