
भंडारा: जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे त्वरित निराकरण करण्याच्या उद्देशाने विधान परिषद सदस्य डॉ. परिणय फुके यांच्या उपस्थितीत 1 एप्रिल रोजी बुधवारी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर जनता दरबार शासकीय विश्राम भवन, भंडारा येथे सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत होणार असून या दरम्यान नागरिकांच्या विविध समस्या ऐकून घेतल्या जाणार आहेत. तसेच नागरिकांकडून निवेदने स्वीकारून संबंधित समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
या जनता दरबारात जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन जिल्हाध्यक्ष आशु गोंडाने यांनी केले आहे.





Total Users : 895441
Total views : 6505855
