
तुमसर प्रतिनिधि/ मुंबई प्रेस क्लब मुंबई येथे महाराष्ट्र इंजिनीयर्स असोसिएशन राज्यव्यापी सर्वसाधारण सभा महाराष्ट्र इंजिनीयर्स असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष इंजी.प्रदीपजी पडोळे यांच्या अध्यक्षतेखाली खाली घेण्यात आली या महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील इंजिनीयर्स असोसिएशन च्या समस्या बद्दल विस्तृत चर्चा करण्यात आली यावेळी सुशिक्षित बेरोजगार अभियंताचे
१.०कोटी बांधकाम रुपयां पर्यंतचे देयके प्राध्यान्याने काढण्यात बाबतचा शासन निर्णय अथवा परिपत्रक काढण्यात यावा या करिता पडोळे यांच्या नेतृत्वाखाली बांधकाम विभागाचे अति.मुख्य सचिव मा.मिलिंद म्हैसकर साहेबांची भेट घेऊन महाराष्ट्र इंजिनियर्स असोसिएशनच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी बांधकाम सचिव मा.श्री.शरदजी राजभोज यांची सुध्दा भेट घेन्यात आली या वेळी वरील मान्यवरानी या निवेदना बाबत शासनाच्या वतीने विशेष लक्ष केंद्रित करण्यात येईल व यावर लवकर तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन दिले निवेदन देताना प्रदेशाध्यक्ष इंजि. प्रदीपजी पडोळे, महासचिव इंजि. एम.ए.हकीम, इंजि.नारायण चौधरी,इंजी.विठ्ठल मामिडवाड, इंजी.युसूफ खान, इंजि.दिलीप बाळसकर मुंबई जिल्हाध्यक्ष इंजी. सुविर कोरगावकर, इंजी.नौशाद कुरेशी,गोंदिया जिल्हाध्यक्ष इंजी.प्रशांत चौहान, इंजी. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष इंजी.मंगेश वटे, यवतमाळ जिल्हाध्यक्ष संतोष झेंडे, इंजी.सुनील कनवाळे, इंजी.रामभाऊ घोटेकर यांच्या सह महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यातील असोसिएशनचे अध्यक्ष व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते





Total Users : 895442
Total views : 6505858
