
तुमसर प्रतिनिधि/ मुंबई येथे महाराष्ट्र इंजिनीयर्स असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष इंजी.प्रदीपजी पडोळे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील इंजिनीयर्स असोसिएशन पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री मा.राजे शिवेंद्रसिंह भोसले साहेबांची भेट घेतली व त्यांच्याशी राज्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंताच्या समस्या बद्दल विस्तृत चर्चा करण्यात आली यावेळी सुशिक्षित बेरोजगार अभियंताचे
१.०कोटी बांधकाम रुपयां पर्यंतचे देयके प्राध्यान्याने काढण्यात बाबतचा शासन निर्णय अथवा परिपत्रक काढण्यात यावा याबद्दल महाराष्ट्र इंजिनियर्स असोसिएशनच्या वतीने मंत्री महोदयांना निवेदन देण्यात आले यावेळी मा.बांधकाम मंत्री भोसले साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद देत या निवेदना बाबत शासनाच्या वतीने विशेष लक्ष केंद्रित करण्यात येईल व यावर लवकर तोडगा काढण्यात येईल व सुशिक्षित बेरोजगार अभियंता बांधवांना न्याय देण्यात येईल असे आश्वासन दिले निवेदन देताना प्रदेशाध्यक्ष इंजि. प्रदीपजी पडोळे, महासचिव इंजि. एम.ए.हकीम नांदेड, इंजि. नारायण चौधरी परभणी, इंजी. विठ्ठल मामिडवाड, इंजी.युसूफ खान, इंजि.दिलीप बाळसकर नांदेड मुंबई जिल्हाध्यक्ष इंजी. सुविर कोरगावकर, इंजी.नौशाद कुरेशी,गोंदिया जिल्हाध्यक्ष इंजी.प्रशांत चौहान, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष इंजी.मंगेश वटे, यवतमाळ जिल्हाध्यक्ष संतोष झेंडे, इंजी.सुनील कनवाळे, इंजी.रामभाऊ घोटेकर यांच्या सह महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यातील असोसिएशनचे अध्यक्ष व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते





Total Users : 895442
Total views : 6505858
