

इंडियन हेडलाईन न्यूज नेटवर्क तुमसर: कलेक्टरांच्या हस्ते डॉ. सुखदेव काटकर यांना नेशनल इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे आजीवन सदस्यत्व ओळखपत्र प्रदानभंडारा, दि. ५ ऑगस्ट २०२६ : नेशनल इंडियन रेड क्रॉस सोसायटी, भारत सरकार अंतर्गत भंडारा जिल्हा शाखेच्या वार्षिक आमसभेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील सिक्रेट डिपार्टमेंट सिक्युरिटी मीटिंग हॉल येथे करण्यात आले. या कार्यक्रमास भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा रेड क्रॉस सोसायटीचे अध्यक्ष श्री. सावंत कुमार प्रमुख उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी श्री. सावंत कुमार यांच्या हस्ते तुमसर येथील हास्य कवी, पत्रकार, समाजसेवक व मनोविज्ञान समुपदेशक डॉ. सुखदेव काटकर यांना नेशनल इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे आजीवन सदस्यत्वाचे ओळखपत्र (Identity Card) प्रदान करण्यात आले. हा सन्मान सोहळा सायंकाळी ५ वाजता पार पडला.कार्यक्रमादरम्यान रेड क्रॉस सोसायटीच्या विविध सामाजिक, आरोग्यविषयक व जनकल्याणकारी उपक्रमांवर तसेच आगामी योजनांवर जिल्हाधिकारी श्री. सावंत कुमार यांच्या उपस्थितीत सविस्तर चर्चा करण्यात आली. वार्षिक आमसभेत उपस्थित सदस्यांनी विविध विषयांवर आपली मते मांडून समाजहिताच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत सूचना केल्या.
नेशनल इंडियन रेड क्रॉस सोसायटी ही भारत सरकारच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेली प्रतिष्ठित मानवतावादी संस्था असून, जिल्हा स्तरावर संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य स्तरावर मा. राज्यपाल अध्यक्ष, तर राष्ट्रीय स्तरावर भारताचे महामहीम राष्ट्रपती अध्यक्ष म्हणून कार्य करतात.डॉ. सुखदेव काटकर हे हास्य कवी, पत्रकार, प्रेरणादायी व्याख्याते, मनोविज्ञान समुपदेशक तसेच सामाजिक क्षेत्रात सक्रिय कार्य करणारे व्यक्तिमत्त्व आहेत. ते क्राईम बुलेट न्यूज, नवी दिल्लीचे जिल्हा प्रतिनिधी, पत्रकार पोलिस योद्धा नेटवर्क न्यूजशी संलग्न असून सावी मिनी नर्सिंग होम, गोवर्धन नगर, तुमसरचे संचालक म्हणूनही कार्यरत आहेत. रेड क्रॉस सोसायटीच्या आजीवन सदस्यत्वाचा सन्मान मिळाल्याबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.





Total Users : 895442
Total views : 6505857
