
तुमसर : ८० व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम’चा अवमान झाल्याचा आरोप करत भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा भंडारा यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.या निषेधाच्या पार्श्वभूमीवर तुमसर शहरातील बावनकरचौकात भाजपच्या व भाजयुमो शिष्टमंडळाने आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी सोनिया गांधी तसेच काँग्रेस पक्षाच्या विरोधात घोषणा देत भाजयुमो कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावरही टीका करत काँग्रेसच्या भूमिकेविरोधात घोषणाबाजी केली. राष्ट्रीय भावना आणि राष्ट्रगीत-राष्ट्रीय गीतांचा सन्मान राखला गेला पाहिजे, अशी भूमिका भाजयुमो व भाजप च्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी मांडली.भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसकडून राष्ट्रहिताच्या विषयांवर सातत्याने घेतल्या जाणाऱ्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत देशविरोधी मानसिकतेला थारा देणार नाही, असा इशारा दिला. यावेळी, जिल्हाध्यक्ष आशू गोंडाणे, विधानसभा प्रमुख प्रदीप पडोळे,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा पालिका उपाध्यक्ष सचिन बोपचे, माजी नगराध्यक्ष गीतताई कोंडेवार,कुंदाताई वैद्य,शहर अध्यक्ष अमरीश सानेकर, प्रीति मालेवार,नगरसेवक चंक्रेश्वर बिसने, पंकज बालपांडे, सोनिया धुर्वे, रेखा चकोले, शैलेश मेश्राम, स्वाती सेलोकर,ललित शुक्ला,शेखर मालेवार,पवन पाटील,प्रतिभा राणा,लिला पारधी,कृष्णा पाटील, गुलाब सेलोकर,संतोष वाहिले,स्वप्नील मनगटे,गौरव शर्मा,अखिल चकोले,बुधराज पटले,शुभम मिश्रा ,अभय धुर्वे,अमित कुरंजेकर,लोकेश बाम्हनोट,नवनाथ मेश्राम,नितेश पाशीने सतीश त्रिभुवनकर व मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, ‘वंदे मातरम’च्या कथित अवमाननेचा मुद्दा राजकीयदृष्ट्या चांगलाच तापला असून, भाजयुमोच्या निषेधामुळे तुमसर शहरातील राजकीय वातावरणातही चर्चेला उधाण आले आहे.





Total Users : 895442
Total views : 6505857
