
तुमसर: देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात आयोजित ‘सेवा संकल्प पंधरवडा’ या कार्यक्रमा अंतर्गत मोहाडी येथील श्रीराम लाँन येथे मोहाडी तालुक्याची संघटनात्मक बैठक व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीच्या अध्यक्ष स्थानी विधान परिषद सदस्य मा.डॉ. परिणयजी फुके साहेब हे होते तर प्रमुख उपस्थिती मधे भंडारा जिल्हा भाजपा जिल्हाध्यक्ष श्री आशुजी गोंडाणे,तुमसर मोहाडी विधानसभा प्रमुख इंजी. प्रदीपजी पडोळे, माजी खासदार श्री.मधुकरजी कुकडे,जिल्हा महामंत्री श्री. भगवान चांदेवार भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन बोपचे,हे होते या वेळी वरील मान्यवरांनी संघटनात्मक विषयावर व “सेवा संकल्प पंधरवाडा” याबद्दल विस्तृत मार्गदर्शन करून कार्यक्रम राबविण्यात बाबत दिशा निर्देश दिले
या वेळी मोहाडी येथे आयोजित कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाच्या विचारधारे चा व पक्षश्रेष्ठींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या पदाधिकारी माजी लोक प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.यावेळी मोहाडी शहर,टांगा, धोप आणि काटेवाम्हणी परिसरातील माजी सरपंच, माजी ग्रामपंचायत सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्त्यांन सह शेकडो पुरुष,महिला व युवानी भाजप मध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपच्या विचार धारेवर विश्वास व्यक्त करत जनसेवेच्या माध्यमातून समाजासाठी कार्य करण्याचा संकल्प यावेळी नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.यावेळी नव्याने सर्व मान्यवरांनी भाजप परिवारात सहभागी झालेल्या सर्वांचे पक्षात स्वागत करून पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.या वेळी या कार्यक्रमाला जिल्हा पदाधिकारी,मोहाडी तालुक्यातील तिन्ही मंडळ अध्यक्ष,महामंत्री,तिन्ही मंडळ चे प्रमुख पदाधिकारी,जिल्हा परिषद सदस्य ,मोहाडी नगरपंचायत चे नगरसेवक, नगरसेविका महिला मोर्चा, युवा मोर्चा,जिल्हा परिषद क्षेत्र प्रमुख, पंचायत समिती क्षेत्र प्रमुख,सर्व आघाड्यांचे पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बुथ प्रमुख यांच्या सह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते





Total Users : 895441
Total views : 6505855
