
भंडारा: भारतीय जनता युवा मोर्चा, भंडारा जिल्ह्याच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत वडनगर ते वाराणसी बाईक सेवा यात्रा दि. 27 व 28 सप्टेंबर रोजी भंडारा जिल्ह्यातून मार्गक्रमण करत विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रमांद्वारे नागरिकांमध्ये सेवा, समर्पण आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत पुढे रवाना झाली.
यात्रेच्या Route–6 अंतर्गत दि. 27 सप्टेंबर रोजी दुपारी भंडारा जिल्ह्य़ात यात्रेचे प्रवेश व स्वागत करण्यात आले. त्यानंतर रोंघा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत यात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी सरपंच व उपसरपंचांचा सत्कार, विद्यार्थ्यांना वही-पेन वाटप आणि वृक्षारोपण असे विविध सेवा उपक्रम घेण्यात आले.
यानंतर यात्रा देवनारा येथील जयसेवा चौक, डोंगरी मुख्य चौक, लोभी येथील जयसेवा व दुर्गावती राणी चौक आणि आष्टी मुख्य चौक येथे पोहोचली. प्रत्येक ठिकाणी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांच्या वतीने बाईक सेवा यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. नाकाडोंगरी येथील राईस मिल येथे यात्रेचे स्वागत व यात्रा सेवार्थी यांच्यासाठी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर यात्रा पुढील प्रवासासाठी बालाघाटच्या दिशेने रवाना झाली.यात्रेच्या Route–8 अंतर्गत दि. 27 सप्टेंबर रोजी सायंकाळी खरबी नाका, जवाहरनगर येथे यात्रेचे प्रवेश व स्वागत झाले. त्यानंतर हेमंत सेलिब्रेशन, भंडारा येथे बाईक रॅलीचे आगमन व स्वागत करण्यात आले. याठिकाणी सफाई कर्मचारी सत्कार समारंभ तसेच युवा नशामुक्ती संवाद या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर यात्रेतील सहभागींच्या मुक्काम व विश्रांतीची व्यवस्था करण्यात आली. दि. 28 सप्टेंबर रोजी सकाळी सेंट पॉल शाळा, भंडारा येथे वृक्षारोपणाचा सेवा उपक्रम घेण्यात आला. त्यानंतर दुसर्या दिवशीच्या बाईक रॅलीचा प्रारंभ झाला. त्रिमूर्ती चौक, भंडारा येथे रॅलीचे स्वागत करण्यात आले.
यानंतर शासकीय ग्रामीण रुग्णालय, लाखनी येथे रुग्ण व नागरिकांसाठी फळ वाटपाचा सेवा उपक्रम घेण्यात आला. त्यानंतर मुख्य चौक, सिंधी कॉलनी, लाखनी तसेच बस स्टॉप चौक, साकोली येथे बाईक सेवा यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. शेंदूरवाफा येथे जेवण व विश्रांतीनंतर दुपारी बाईक सेवा यात्रा गोंदिया जिल्ह्याच्या दिशेने रवाना झाली. या संपूर्ण प्रवासादरम्यान भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा, तालुका व मंडळ पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. विविध ठिकाणी आयोजित केलेल्या सामाजिक उपक्रमांमधून सेवा, समर्पण, संकल्प आणि राष्ट्रनिर्माण या भावनेचा संदेश देण्यात आला. वडनगर ते वाराणसी बाईक सेवा यात्रेच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांशी संवाद साधत सेवा कार्याला अधिक व्यापक स्वरूप देण्याचा संकल्प करण्यात आला. या संपूर्ण सेवा संकल्प अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी भाजयुमो जिल्हाध्यक्ष सचिन बोपचे, भाजपा जिल्हाध्यक्ष आशू गोंडाणे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष माहेश्वरी नेवारे, तिलक वैद्य, भाजयुमो जिल्हा महामंत्री महेंद्र गभने, दीपक हिवरे, तुलसीदास बुरडे, विश्वनाथ बांडेबुचे, धर्मेंद्र कटरे, अरुण बोपचे, रूपेश दुरूगकर, अतूल गेडाम, रूपराज सोनवणे, अरविंद पटले, सतीश सोनवणे, दीपक घोडीचोर, तुषार हट्टेवार, अक्षय भिवगडे, गुलशन कोरे, यश ठाकरे, विपुल पराते, आकाश फाले प्रशांत पुरुषार्थी, हर्षल टांगले, रोहित नागपुरे, वृशभ सुदामे, आदित्य बांते, अश्विन धरमसारे, अभिषेक गिरीपुंजे, गणेश हत्तीमारे, सुमीत मेघराजानी, योगेश तितरमारे, मोहित रणदिवे, सचिन कुथे, संदीप भांडारकर, धनंजय घाटबांधे, महेश आकरे, देवा बोरकर, नितेकेश राऊत, व्यंकटेश येवले, किशोर पोगळे, मनीष कापगते, सपन कापगते, उपेंद्र रहांगडाले, डुलीचंद रहांगडाले, सुभाष ठाकरे, सुखचंद पटले, देवा रहांगडाले, राजू रहांगडाले, दिनेश चौरावार, नीलेश जिवतोडे, छबीलाल राऊत, विनित रीनायते, निसर्ग पिकलमुंडे, शुभम कटकवार, कृष्णा कापगते, प्रज्वल लांजेवार, संदीप कटकवार, चेतन बुधे, अनुज मलेवार, शुभम मिश्रा, धामदेव वनवे, शुभम पारधी, पियुष फूलबांधे, युवती प्रमुख पेजल भुरे, निकिता मेश्राम व कल्याणी मते यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
— भारतीय जनता युवा मोर्चा, भंडारा जिल्हा





Total Users : 895441
Total views : 6505855
