
भंडारा : महर्षी विद्या मंदिरचा १३ वर्षीय विद्यार्थी सूर्यांशु सुभाष बारसे याने जलतरण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याने कारधा ते कोरंभी असा वैनगंगा नदीतील जलतरणाचा प्रवास अवघ्या १ तास ३५ मिनिटांत पूर्ण करून आपले कौशल्य सिद्ध केले.
लहान वयातच जलतरण क्षेत्रात अशी कामगिरी करणाऱ्या सूर्यांशु बारसे याच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याला अविनाश निंबार्ते आणि करण शेंडे यांनी जलतरणाचे प्रशिक्षण दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सूर्यांशुने हे यश संपादन केले. सूर्यांशुच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याचे कुटुंबीय, शिक्षक आणि परिसरातील नागरिकांकडून त्याचे अभिनंदन केले जात आहे. त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.





Total Users : 895441
Total views : 6505855
