Search
Close this search box.
जनसेवा हे माझे आद्य कर्तव्य ; जनतेला न्याय मिळवून देणे हीच माझी प्रमुख भूमिका – पंकज एस यादव “अवकाळीचे येणे दुष्काळात तेरावा महिना” रेल्वे ब्रीज का निर्माण कार्य ८ दिन में सुरु करे अन्यथा करेंगे आंदोलन – विधायक विनोद अग्रवाल प्रताप मेमोरियल चेरिटेबल द्वारा ट्रस्ट 10 मई को ग्राम कामठा में भव्य सर्वधर्म सामुहिक विवाह समारोह पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के संयोजन में विवाह की तैयारी शुरू आज हनुमान चालीस का पाठ पत्रकार अमृतलाल (लालु) चरडे यांची पदोन्नती मानवता को जिवित रखने के लिए रक्तदान जरुरी- रक्तदूत प्रीतम राजाभोज.. करडी मुंढरी रस्त्याचे काम कासव गतीने कलार समाज भोपाल के 18 वे स्थापना दिवस समारोह संपन्न सामान्य कावीळ साठी नवजात बालकांना ‘रेफर टू भंडारा’ वैद्यकिय अधीक्षकांचे दुर्लक्ष 
1710993667408
WhatsApp Image 2024-04-12 at 10.41.57_8c08aba1
1710994486762
WhatsApp Image 2024-02-29 at 17.04.28_6ab901dd
mamacha
WhatsApp Image 2023-08-31 at 00.27.18
IMG-20231030-WA0012

सामान्य कावीळ साठी नवजात बालकांना ‘रेफर टू भंडारा’ वैद्यकिय अधीक्षकांचे दुर्लक्ष 

तुमसर उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार

तुमसर प्रतिनिधि/ येथील उपजिल्हा रुग्णालयातील बालरोगतज्ञ व वैद्यकिय अधीक्षकांच्या ‘निष्काळजीपणा’मुळे दररोज डझनभर नवजात बालकांना रेफर टू भंडारा पाठवत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.सद्या बहुतांश नवजात बालकांना सामान्य कावीळ (पिलिया) होत आहे. शारीरिक नवजात कावीळ च्या उपचारासाठी फोटो थेरपी युनिट सुद्धा या उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध आहे फोटोथेरपी हा एक प्रकारचा उपचार आहे जो त्वचेच्या स्थितीवर उपचार करण्यासाठी अल्ट्राव्हायोलेट ब्लु लाईट प्रकाशाचा वापर करतो आणि नवजात कावीळसाठी सामान्य उपचार आहे. माता नवजात बालक यांची सेवा करणे डॉक्टरांचे आद्य कर्तव्य आहे, या धारणेला तिलांजली देऊन रूग्ण माता कडे व या नवजात बालकांकडे वेळीच लक्ष दिले जात नाही योग्य तापसण्याकरत करीत नाही तर बालकांच्या नातेवाईकांना जिल्हा रुग्णालय भंडारा किंवा खाजगी रुग्णालयात उपचार करण्याचा सल्ला दिला जातो.त्यामुळे बहुतांश कंटाळून परत खासगी रूग्णालयाकडे धाव घेतात.जे डॉक्टर अश्याप्रकारे सल्ला देतात त्यांचेच खाजगी रुग्णालय येथे असल्याचे बोलले जाते.त्यावरही जे रूग्ण आहेत त्यापैकी अनेक गंभीर रूग्णांना डॉक्टरांचा अभाव, उपकरणांचा अभाव, साहित्याचा तुटवडा दाखवून भंडारा जिल्हा रुग्णालयात रवाना केले जाते. मूल जन्माला घालणे म्हणजे स्त्रीचा दुसरा जन्मच! स्त्री गरोदर राहिल्यापासून ते प्रसूती होईपर्यंत प्रत्येक बाबतीत स्त्रीरोगतज्ज्ञाची भूमिका महत्त्वाची असते. तर मुलावरील उपचारासाठी बालरोगतज्ज्ञाची नितांत आवश्यकता असते. मात्र उपजिल्हा रुग्णालय विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे माताबालकांचेच आरोग्य धोक्यात असल्याचे उघड आले आहे.येथील प्रभारी वैद्यकिय अधीक्षक बालरोग तज्ज्ञ आहेत हे मात्र विशेष..या रुग्णालयात सर्व सोई सुविधा उपचार उपलब्ध असून सुद्धा उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर जर बहुतांश नवजात बालकाच्या नातेवाईकाची दिशाभूल करून भंडारा खाजगी रुग्णालयात रेफर करण्यासाठी नातेवाईकांना सल्ला देत असतील तर अशा डॉक्टरांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सुद्धा नवजात बालकाच्या कुटुंबीयासह नागरिकांनी केली आहे.

जर अश्या प्रकारची परिस्थिती या उपजिल्हा रुग्णालयात असेल तर उच्च स्तरीय समिती गठीत करून कारवाई करण्यात येईल.

–डॉ.कांचन वानेरे

उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर मंडळ,नागपूर

Leave a Comment

loader-image
BHANDARA GONDIA
3:53 am, May 16, 2024
temperature icon 31°C
overcast clouds
Humidity 39 %
Pressure 1008 mb
Wind 3 Km/h
Wind Gust Wind Gust: 6 Km/h
Clouds Clouds: 100%
Visibility Visibility: 0 km
Sunrise Sunrise: 5:54 am
Sunset Sunset: 6:58 pm

Our Visitor

5 1 2 0 4 6
Total Users : 512046
Total views : 523883