Search
Close this search box.
पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल द्वारा ग्राम कामठा में आयोजित सर्वधर्म सामुहिक विवाह समारोह में 91 युगल हुए परिणयबध “महक के जुस्तजू ‘काव्य संग्रह का हुआ प्रकाशन,हिंदी भाषिक प्रेमियों ने दी बधाई” देव्हाडा बु. बाजारात रस्त्यावरच वाहनाची गर्दी धोकादायक अपघाताला आमंत्रण देणारी झाली. जनसेवा हे माझे आद्य कर्तव्य ; जनतेला न्याय मिळवून देणे हीच माझी प्रमुख भूमिका – पंकज एस यादव “अवकाळीचे येणे दुष्काळात तेरावा महिना” रेल्वे ब्रीज का निर्माण कार्य ८ दिन में सुरु करे अन्यथा करेंगे आंदोलन – विधायक विनोद अग्रवाल प्रताप मेमोरियल चेरिटेबल द्वारा ट्रस्ट 10 मई को ग्राम कामठा में भव्य सर्वधर्म सामुहिक विवाह समारोह पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के संयोजन में विवाह की तैयारी शुरू आज हनुमान चालीस का पाठ पत्रकार अमृतलाल (लालु) चरडे यांची पदोन्नती मानवता को जिवित रखने के लिए रक्तदान जरुरी- रक्तदूत प्रीतम राजाभोज..
1710993667408
WhatsApp Image 2024-04-12 at 10.41.57_8c08aba1
1710994486762
WhatsApp Image 2024-02-29 at 17.04.28_6ab901dd
mamacha
WhatsApp Image 2023-08-31 at 00.27.18
IMG-20231030-WA0012

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी: खा. सुनील मेंढे यांची भेट

प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाकडून सुरू असलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून भंडारा जिल्ह्यातील ओबीसी बांधव काही मागण्यांना घेऊन साखळी उपोषणाला बसले होते. या आंदोलकांची खा. सुनील मेंढे यांनी भेट घेत ओबीसी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले.

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ओबीसींचे आरक्षण संकटात येण्याची चिन्हे दिसू लागताच राज्यभर ओबीसी बांधवांच्या वतीने आंदोलन सुरू झाली आहेत. भंडाऱ्यातही साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली होती. या आंदोलकांची खासदार सुनील मेंढे यांनी आंदोलनस्थळी भेट घेतली. या आरक्षणाच्या लढ्यात मी सदैव तुमच्या सोबत आहे असा विश्वास यावेळी त्यांनी दिला.

मराठ्यांना ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण देऊ नये ही प्रमुख मागणी आंदोलकांची आहे. आंदोलकांच्या या मागणीशी आपण पूर्णपणे सहमत असून यासाठी आपण एकत्र लढा देऊ असेही चर्चेत सांगितले. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहाचा विषय लवकर निकाली निघावा, अशी आंदोलकांची मागणी होती. त्या दृष्टीने तत्काळ बैठक बोलून 1 ऑक्टोबर पासून ओबीसी मुला मुलींच्या वस्तीगृहात प्रवेश नोंदणीला सुरुवात होईल, या दृष्टीने प्रयत्न करावेत असे निर्देश आंदोलन स्थळावरून दूरध्वनी द्वारा मा जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

यावेळी आंदोलकांचे जिल्हाधिकारी महोदयांशी बोलणेही करून दिले. मुंबई येथे 29 रोजी होणाऱ्या बैठकीत भंडारा जिल्ह्याच्या दोन प्रतिनिधींना उपस्थित राहण्याची संधी मिळावी असा आग्रह आंदोलकांचा होता. या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी संपर्क करून आपली मागणी पोहोचवली जाईल व भंडारा-गोंदिया जिल्ह्याला बैठकीत प्रतिनिधीत्व मिळावे या दृष्टीने पुरेपूर प्रयत्न केला जाईल असेही यावेळी खासदार सुनील मेंढे यांनी आंदोलकांना सांगितले.

Leave a Comment

loader-image
BHANDARA GONDIA
5:39 am, May 19, 2024
temperature icon 30°C
scattered clouds
Humidity 40 %
Pressure 1005 mb
Wind 11 Km/h
Wind Gust Wind Gust: 20 Km/h
Clouds Clouds: 35%
Visibility Visibility: 0 km
Sunrise Sunrise: 5:53 am
Sunset Sunset: 6:59 pm

Our Visitor

5 1 2 2 7 0
Total Users : 512270
Total views : 524212

Our Visitor

5 1 2 2 7 0
Total Users : 512270
Total views : 524212