
भंडारा, नुकताच जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात सर्वाधिक 58 ग्रामपंचायत थेट सरपंच आणि सदस्य पदासाठी सार्वत्रिक निवडणूक पार पडली त्यात, सालेबर्डी ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यामुळे 57 ग्रामपंचायत चे निवडणुकीत राज्यात पहिल्यांदा कान्द्री ग्रामपंचायत च्या स्वरूपात भारत राष्ट्र समितीचा सरपंच आणि 7 सदस्य निवडून येताबरोबर लागोपाठ शुद्ध 18 आणि 6 इतर पक्षासोबत असे एकूण 24 ग्रामपंचायत आणि 184 सदस्य निवडून आल्याचे जाहीर करून वातावरण गुलाबी झाल्याचे आनन्द तुमसर या विधानसभा स्तरावरील शहरात भारत राष्ट्र समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत फटाके फोडून बँड वाजवून साजरा करण्यात आला.
यावेळी BRS चे पूर्व विदर्भ समन्वयक तथा माजी आमदार चरण भाऊ वाघमारे, विधानसभा समन्वयक ललित जी शुक्ला,किसान आघाडी जिल्हा समन्वयक राजेश जी पटले, तालुका समन्वयक राजेंद्र जी तुरकर,अनिल जी जिभकाटे, हिरालाल जी रोटके,गौरव नवरखेले,जगदीश उके, महेताबसिंग ठाकूर, राजू गायधने,परमानंद कटरे,शेखर जी बिसेन, वसंतजी आगाशे,सुलभाताई हटवार,रिनाताई माटे, किशोर माटे, तरुण लांजेवार, राकेश भेलावे,प्रवीण कहालकर,सागर बिसने, पंकज राठोड , नावेद शेख,आशिष गजभिये,धर्मेंद्र वाघमारे, योगेश कापसे,डॉ.धनपाल शेंडे,रामेश्वर भुसारी, अविनाश उपरिकर, उमेश बघेले, माहुले जी,आशिष ठाकरे,सेवकराम वाढीभस्मे, नितेश बी पाटील, देवेंद्रजी मलेवार, अनिल जी हटवार,राजू बडवाईक, आणि मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.





Total Users : 895441
Total views : 6505855
