
तुमसर प्रतिनिधि/ तुकाराम आश्रम माडगी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्र तर्फे देव्हाडी जिल्हा परिषद क्षेत्र येथील बुथ आढावा बैठक घेण्यात आली.याप्रसंगी देवचंदजी ठाकरे अध्यक्ष तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्र तसेच प्रमुख पाहुणे म्हणून धनेद्र जी तुरकर ,राजकुमार माटे जिल्हाध्यक्ष ओ बी सी सेल ,के के पंचबुद्धे माजी जि. प.सदस्य ,मनोज भाऊ झुरमुरे प.स.समिती सदस्य तथा नवनियुक्त रा.युवक काँ.पार्टी तालुका तुमसर,सौ.मीनाक्षी सहारे प.स.सदस्य देव्हाडी,देवेंद्र शहरे जि प देव्हाडी सर्कल प्रमुख व क्षेत्रातील सरपंच ,उपसरपंच, सदस्य सदस्या गावातील बुथ प्रमुख आणि पार्टीतील संपूर्ण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी मनोज भाऊ झुरमुरे यांचा तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल शॉल व श्रीफळ देऊन पाहुण्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला.आणि त्यांच्या पुढच्यावाटचालीसाठी शुभेच्या दिल्यात.
या कार्यक्रमानिमित्त बुथ प्रमुखाशी सविस्तर चर्चा करून त्यांना योग्य त्या दिशेने सूचना करण्यात आल्या.या कार्यक्रमामध्ये राजकुमारजी माटे ,के के पंचबुद्धे,धनेद्रजी तुरकर तसेच देवचंद जी ठाकरे यांनी गावा गावा मध्ये पार्टी कशी मजबूत केली जाईल ,पार्टीची काम कस करावा ,आपआप सातला भांडण दूर सारून लोकसभेची निवडणुक जवळ असून त्या अनुषंगाने आपण काम केले पाहिजे हे आप आपल्या परी ने सर्व पाहुण्यांनी आपल्या संबोदनातून सांगितले.
या कार्यक्रमामध्ये मा.श्री प्रफुल भाई पटेल खासदार राज्यसभा तसेच सर्वांचे लाडके ,तडफदार ,लोकप्रिय आमदार श्री .राजुभाऊ कारेमोरे तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्र यांच्यावर विश्वास ठेवून काही कार्यकर्त्या पक्ष प्रवेश घेतला. यावेळी संचालन श्री श्रीधर हिंगे स.ग्रा.प.माडगी तसेच आभार के के पंचबुद्धे माजी जी.प.सदस्य यांनी मानले.





Total Users : 895508
Total views : 6505936
