
१९ ऑगस्ट २०२५ पासून बेमुदत कामबंद / संप
???? गोंदिया: जिल्हा परिषद येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अधिकारी व कर्मचारी त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी बेमुदत कामबंद आंदोलन सुरु ठेवत आहेत.
???? शासनाने १४ मार्च २०२४ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार समान काम, समान वेतन लागू करणे अपेक्षित होते, परंतु आजतागायत याची अंमलबजावणी झाली नाही.
???? उच्च न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय आहे.
???? आरोग्य सेवा विस्कळीत होत असताना संपूर्ण जबाबदारी शासनावरच आहे.
???? त्या प्रसंगी मी स्वतः उपस्थित राहून अधिकारी व कर्मचार्यांशी संवाद साधला, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि शासनाच्या निष्काळजीपणाविरोधात कठोरपणे भूमिका घेतली.
???? त्यांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष देऊन न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.
✊ हा लढा केवळ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा नाही, तर जनतेच्या आरोग्याच्या हक्काचा प्रश्न आहे. शासनाने उच्च न्यायालयाच्या आदेशासह मागण्या तातडीने मान्य करणे ही त्यांची पवित्र जबाबदारी आहे. अन्यथा, कर्मचाऱ्यांचा आणि जनतेचा रोष अनिवार्यपणे प्रकट होईल.
मागण्या:
1️⃣ औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशांचे तातडीने पालन करा.
2️⃣ १४ मार्च २०२४ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करा.
3️⃣ अंमलबजावणी होईपर्यंत समान काम, समान वेतन लागू करा.
4️⃣ NHM अधिकारी व कर्मचार्यांना त्वरीत वेतन देण्याची हमी द्या, अन्यथा कठोर आंदोलन अनिवार्य होईल.
आमदार मा. श्री. संजय पुराम, आमगाव-देवरी विधानसभा, महाराष्ट्र





Total Users : 895442
Total views : 6505858
