
तुमसर: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज तुमसर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित बैठकीला माजी आमदार श्री राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष श्री नानाभाऊ पंचबुद्धे, आमदार श्री राजुभाऊ कारेमोरे, श्री धनंजय दलाल, मध्यवर्ती बँक अध्यक्ष श्री सुनील फुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. पक्षाच्या संघटनात्मक बांधणी, जनसंपर्क, आणि आगामी निवडणूक नियोजनाबाबतही महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली.

या बैठकीला संबोधित करताना माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी स्थानिक स्तरावरील पाणीपुरवठा, वीज, रस्ते, शिक्षण व आरोग्य या महत्त्वाच्या स्थानिक प्रश्नांवर व अडचणींवर मात करून तुमसर शहराचा सर्वांगीण विकास करण्याची क्षमता खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या नेतृत्वाखाली आहे याची जाणीव सर्व कार्यकर्त्याना आहे. आपण सर्वांनी पक्षाची विचारधारा व विकासवादी भूमिका नागरिकांना दिली पाहिजे.
पुढे बोलतांना म्हणाले की शहराच्या विकासासाठी ऊर्जावान व क्षमतावान नेतृत्व आवश्यक असते आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे असा विश्वास या बैठकीत त्यांनी व्यक्त केला.
बैठकीला सर्वश्री राजेंद्र जैन, नानाभाऊ पंचबुद्धे, राजुभाऊ कारेमोरे, धनंजय दलाल, सुनील फुंडे, देवचंद ठाकरे, अभिषेक कारेमोरे, राजेश देशमुख, योगेश सिंगनजुडे, सुनील थोटे, सलाम तुरक, तिलक गजभीये, विक्रम लांजेवार, सागर गभने, यासीन छवारे, संदेश डुंबरे, पमाताई ठाकूर, सरोजताई भुरे, अश्विनी थोटे, मीनाताई गाढवे, नंदाताई ढोरले, नेहाताई मोटघरे, जाकिर तूरक, प्रदीप भरणेकर, खेमराजजी गभने, वंदनाताई आकरे, गुरुराज कुंदवाने, शैलेश भाऊ साखरवाडे, कविताताई साखरवाडे, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Total Users : 895442
Total views : 6505858
