
तुमसर: सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालयाच्या दंत विभागामध्ये अत्याधुनिक नवीन डेंटल चेअरचे उद्घाटन माननीय वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन मिसुरकर यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला डॉ. सचिन बाळबुधे, डॉ. ज्योत्स्ना शिंदे (दंत शल्य चिकित्सक), डॉ. कोरडे तसेच श्रीमती रंजना नंदनवार (सहाय्यक अधिसेविका) यांची उपस्थिती लाभली.
नवीन डेंटल चेअरच्या उपलब्धतेमुळे रुग्णांना अधिक सुसज्ज, सुरक्षित व आधुनिक दंत उपचार सेवा मिळणार असून उपचारांची गुणवत्ता आणि कार्यक्षमता यामध्ये लक्षणीय वाढ होणार आहे. यामुळे ग्रामीण व शहरी परिसरातील रुग्णांना अत्याधुनिक सुविधा स्थानिक स्तरावरच उपलब्ध होणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन मिसुरकर यांनी सांगितले की, “रुग्णालयात आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे ही आमची प्राथमिकता असून, या नव्या उपकरणामुळे दंत सेवेत निश्चितच सकारात्मक बदल घडेल.” कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.





Total Users : 895442
Total views : 6505858
