
इंडियन हेडलाइन न्यूज़ नेटवर्क तुमसर: महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय श्री. अजितजी पवार यांच्या जयंती निमित्त आज तुमसर येथील तहसील कार्यालयात महसूल विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर चे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी तुमसर मोहाडी विधानसभा प्रमुख इंजी. प्रदीपजि पडोळे विशेष अतिथी मनुन उपस्थित होते यावेळी आयोजकाच्या वतीने त्यांचे स्वागत सत्कार करण्यात आले या प्रसंगी महाराजस्व समाधान शिबिरात त्यांनीं मार्गदर्शन करतेवेळी महाराष्ट्र शासनाच्या विविध प्रकारच्या कल्याण कारी योजना बद्दल माहिती दिली व या योजनेचा लाभ घ्यावा हे उपस्थितांना आवाहन केले या वेळी इतर मान्यवराणी वअधिकारी वर्गानी शासनाच्या भरपूर योजनेबद्दल विस्तृत माहिती देऊन मार्गदर्शन केले या शिबिरात प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी श्री. सावनकुमारजी,तुमसर-
तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री.राजुभाऊ कारेमोरे,माजी खासदार मधुकरजी कुकडे,भंडारा जिल्हा भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.आशुजी गोंडाने,मोर्चा महिला जिल्हाध्यक्ष सौ. माहेश्वरीताई नेवारे,जिल्हा महामंत्री भगवानजी चांदेवार जिल्हा परिषद सदस्य बंडूजी बनकर,दिलीपजी सार्वे, भारतीय जनता पार्टी तुमसर शहर,तुमसर ग्रामीणचे प्रमुख पदाधिकारी,नगरसेवक नगरसेविका व प्रशासकीय अधिकारी यांच्या सह इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर,प्राविण्य प्राप्त विद्यार्थी, खेळाडू, प्रगतिशील शेतकरी,इतर अनेक मान्यवरांचे ही स्वागत सत्कार करण्यात आले या शिबिरात तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्रातील नागरिक गण,महिलावर्ग व शासनाच्या विविध प्रकारच्या योजनेचे लाभार्थी प्रामुख्याने उपस्थित होते





Total Users : 895441
Total views : 6505855
