
इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क तुमसर: तुमसर तहसील येथील सोंड्या येथील बावनधडी नदीवर कोट्यावधी रुपये खर्च करून सोंड्या टोला उपसा सिंचन परियोजना चे काम करण्यात आले होते ही योजना आता शोभेचे पांढरा हत्ती ठरत आहे परिसरातील शेतकरी बांधवांन कडून या वर्षीही खरीप हंगामातील धान लागवडीला सुरूवात झालेली आहे

परंतु या वर्षी पाऊस खूप कमी प्रमाणात पडल्याने शेतकरी बांधवांना धान पीक लागवडीसाठी पाण्याची खूप कमतरता भासू लागली आहे परिसरातील १५ ते २० हजार हेक्टर शेतजमीन लागवड करतात परंतु पाण्याची कमतरता असल्याने हजारो शेतकरी बांधवांना अडचणी निर्माण झाल्या आहेत मागच्या वर्षी खरीप हंगामात ७ जुलै ला सोंड्या टोला उपसा सिंचन योजनेतून चांदपूर जलाशयात पानी सोडन्यात आले होते व जलाशय भरण्यात आले होते परंतु या वर्षी आतापर्यंत अनेक वेळा मागणी करण्यात आली पण सिंचन योजनेतून चांदपूर जलाशयात पाणी सोडण्यात आले नाही यामुळे जलाशयात यावर्षी फक्त १०%टक्के जलसाठा उपलब्ध आहे या अनुषंगाने तुमसर मोहाडी विधानसभा प्रमुख इंजी.प्रदीपजी पडोळे यांनी आज उपसा सिंचन योजनेला परिसरातील भाजपा पदाधिकारी यांच्या सोबत भेट देऊन परिस्थिती चा आढावा घेतला व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून शेतकरी बांधवाच्या अडचणी त्यांच्या लक्षात आणून दिल्या या वर अधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले की वरिष्ठ अधिकारी यांच्या कडून पाणी सोडण्या बाबत सूचना देण्यात आल्या नाहीत त्यामुळे आम्हीं असमर्थ आहोत ही माहिती दिली या प्रसंगी त्यांनी या आठवड्यात जर हा प्रश्न मार्गी लावून शेतकरी बांधवांच्या अडचणी दूर केल्या नाहीत तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने आक्रमक भूमिका घेऊन आंदोलन करण्यात येईल असे संबंधित अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष श्री.धनेद्रजी तुरकर, भाजपा किसान मोर्चाचे श्री.अशोकजी पटले,माजी पंचायत समिती सदस्य श्री.बंटीजी बानेवार, श्री.गजाननजी निनावे,श्री. विकासजी पारधी,श्री.बाला भाऊ तुरकर श्री.छोटुजी ठाकरे,श्री.पंकज शुक्ला, श्री. सतिशजी पटले प्रामुख्याने उपस्थित होते





Total Users : 895441
Total views : 6505855
