
तिरोडा : धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्यात यावा, या मागणीसाठी राजाभोज चौक, तिरोडा येथे १५ सप्टेंबरपासून उपोषणास बसलेले नरेंद्र रहांगडाले यांचे उपोषण तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या मध्यस्थीने मागे घेण्यात आले.धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याची मागणी शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित असून, या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणाची आमदार विजय रहांगडाले यांनी दखल घेतली. मध्यस्थी करून संबंधित प्रशासनाशी चर्चा करण्यात आली. सदर मागणी येत्या हिवाळी अधिवेशनात शासनाकडे सादर करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आल्यानंतर नरेंद्र रहांगडाले यांनी आपले उपोषण मागे घेतले.यावेळी एड. माधुरी रहांगडाले, जि.प. सदस्या पूजा गायकवाड, तिरोडा उपविभागीय अधिकारी, तहसीलदार श्री. नारायण ठाकरे, पोलीस निरीक्षक श्री. अमित वानखेडे, नगर परिषद तिरोडा शिक्षण सभापती श्री. देवेंद्र तिवारी आणि कृषी उत्पन्न बाजार समिती तिरोडाचे माजी सभापती श्री. योगेंद्र कटरे यांच्यासह संबंधित मान्यवर उपस्थित होते.
धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस मिळावा, या मागणीसाठी शासनस्तरावर प्रश्न मांडण्याच्या आश्वासनामुळे उपोषण मागे घेण्यात आले आहे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी पुढील कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





Total Users : 895441
Total views : 6505855
