“लेक लाडकी आई-बाबाची’ उपक्रमाचा दुसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा”
तुमसर: शहरात सेव डॉटर फाउंडेशन तर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘लेक लाडकी आई-बाबाची’ या अनोख्या उपक्रमाचा दुसरा वर्धापन दिन जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी राजाराम लॉन येथे मोठ्या थाटामाटात पार पडला. या उपक्रमातून कन्येसह त्यांच्या आई-वडिलांचा सन्मान करून मुलींचे स्थान अधोरेखित केले जाते.मागील वर्षी १४६ कुटुंबांचा गौरव करण्यात आला होता, तर यावर्षीही १२९ लेकी व त्यांच्या पालकांचा…