नगरधन येथे मंडई उत्सवाचा रंगतदार प्रारंभ; तीन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
नगरधन (ता. रामटेक) – सांस्कृतिक परंपरा आणि लोककलेच्या साक्षीदार असलेल्या नगरधन गावात आजपासून मंडई उत्सवाची रंगतदार सुरुवात झाली आहे. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून गावकऱ्यांसह परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या मंडई उत्सवात स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळणार असून लोकनृत्य, नाट्यप्रयोग, कीर्तन, भजन, बालकलाकारांची सादरीकरणे यांसह…