Search
Close this search box.
जनसेवा हे माझे आद्य कर्तव्य ; जनतेला न्याय मिळवून देणे हीच माझी प्रमुख भूमिका – पंकज एस यादव “अवकाळीचे येणे दुष्काळात तेरावा महिना” रेल्वे ब्रीज का निर्माण कार्य ८ दिन में सुरु करे अन्यथा करेंगे आंदोलन – विधायक विनोद अग्रवाल प्रताप मेमोरियल चेरिटेबल द्वारा ट्रस्ट 10 मई को ग्राम कामठा में भव्य सर्वधर्म सामुहिक विवाह समारोह पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के संयोजन में विवाह की तैयारी शुरू आज हनुमान चालीस का पाठ पत्रकार अमृतलाल (लालु) चरडे यांची पदोन्नती मानवता को जिवित रखने के लिए रक्तदान जरुरी- रक्तदूत प्रीतम राजाभोज.. करडी मुंढरी रस्त्याचे काम कासव गतीने कलार समाज भोपाल के 18 वे स्थापना दिवस समारोह संपन्न सामान्य कावीळ साठी नवजात बालकांना ‘रेफर टू भंडारा’ वैद्यकिय अधीक्षकांचे दुर्लक्ष 
1710993667408
WhatsApp Image 2024-04-12 at 10.41.57_8c08aba1
1710994486762
WhatsApp Image 2024-02-29 at 17.04.28_6ab901dd
mamacha
WhatsApp Image 2023-08-31 at 00.27.18
IMG-20231030-WA0012

चार हजारांची लाच स्विकारतांना तलाठ्याला रंगेहात अटक

रामटेक तालुका प्रतिनिधी :- सुरेंद्र बिरणवार

रामटेक :- शेत नावावर करण्याच्या विषयावरून तालुक्यातील मौजा काचुरवाही, मसला येथील तलाठयाला तक्रारदाराकडून चार हजार रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज ६ फेब्रुवारी ला रंगेहात अटक केली. कारवाईमुळे परिसरातील तलाठी वर्गात प्रचंड खळबळ उडाली आहे.

श्री.मुकेश दुलिराम फुलबांधे वय ४४ वर्ष, पद- तलाठी मौजा काचुरवाही,अतिरिक्त प्रभार मौजा मसला. ह.मु. ज्ञानदीप कॉन्व्हेंट जवळ शितलवाडी असे आरोपी तलाठ्याचे नाव आहे. सविस्तर माहितीनुसार तक्रारदार यांचे वडिलांचे नावावरील शेत सर्व्हे न.२०८/२ हा तक्रारदार यांचे काकाचे नावावर आणि तक्रारदार यांचे काकाचे नावावरील शेत सर्व्हे न.२०८/३, २८८ हा तक्रारदार यांचे वडिलांचे नावावर करण्याचा अदलाबदलीच्या लेखावरून फेरफार करून देण्याकरिता, आरोपी तलाठयाने तक्रारदार यांना ५,००० रुपये लाचेची मागणी केली मात्र तडजोड अंती ४,००० रुपये स्विकारण्याचे ठरले. त्यानुसार तक्रारदार यांचे कडून ४,०००रू लाच रक्कम स्विकारतांना आरोपी तलाठी स्वतः मिळून आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. रामटेक पोस्टेला गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक, प्रवीण लाकडे, पोहवा. विकास सायरे,नापोशी सारंग बालपांडे, नापोशी राजू जांभूळकर, मनापोशी, वंदना नगराळे,सर्व ला.प्र.वि. नागपूर यांनी केलेली आहे.

Leave a Comment

loader-image
BHANDARA GONDIA
2:55 pm, May 12, 2024
temperature icon 34°C
broken clouds
Humidity 36 %
Pressure 1009 mb
Wind 24 Km/h
Wind Gust Wind Gust: 19 Km/h
Clouds Clouds: 73%
Visibility Visibility: 0 km
Sunrise Sunrise: 5:55 am
Sunset Sunset: 6:56 pm

Our Visitor

5 1 1 9 6 8
Total Users : 511968
Total views : 523743