Search
Close this search box.
जनसेवा हे माझे आद्य कर्तव्य ; जनतेला न्याय मिळवून देणे हीच माझी प्रमुख भूमिका – पंकज एस यादव “अवकाळीचे येणे दुष्काळात तेरावा महिना” रेल्वे ब्रीज का निर्माण कार्य ८ दिन में सुरु करे अन्यथा करेंगे आंदोलन – विधायक विनोद अग्रवाल प्रताप मेमोरियल चेरिटेबल द्वारा ट्रस्ट 10 मई को ग्राम कामठा में भव्य सर्वधर्म सामुहिक विवाह समारोह पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के संयोजन में विवाह की तैयारी शुरू आज हनुमान चालीस का पाठ पत्रकार अमृतलाल (लालु) चरडे यांची पदोन्नती मानवता को जिवित रखने के लिए रक्तदान जरुरी- रक्तदूत प्रीतम राजाभोज.. करडी मुंढरी रस्त्याचे काम कासव गतीने कलार समाज भोपाल के 18 वे स्थापना दिवस समारोह संपन्न सामान्य कावीळ साठी नवजात बालकांना ‘रेफर टू भंडारा’ वैद्यकिय अधीक्षकांचे दुर्लक्ष 
1710993667408
WhatsApp Image 2024-04-12 at 10.41.57_8c08aba1
1710994486762
WhatsApp Image 2024-02-29 at 17.04.28_6ab901dd
mamacha
WhatsApp Image 2023-08-31 at 00.27.18
IMG-20231030-WA0012

छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान, तुमसर च्या वतीने आयोजित शिवकालीन मैदानी खेळांचे मोफत प्रशिक्षण आणि बालसंस्कार शिबिराला सुरवात

तुमसर पतिनिधि/ दिनांक 27 एप्रिल ते 1 मे पर्यंत असलेल्या 6 दिवशीय मोफत बालसंस्कार शिबिराची सुरुवात झाली असून यात प्रामुख्याने शिवकालीन मर्दानी खेळांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. सोबतच तायक्वांडो, जुडो यासारख्या पाश्चात्त्य खेळांचा समावेश करण्यात आला आहे. मुला मुलींना त्यांच्या स्वयंसंरक्षणार्थ विविध कला अवगत व्हाव्यात दांडपट्टा, लाठ्या काठय़ा, तलवारबाजी यासारख्या शारीरिक विकासात्मक शिवकालीन कलांची जाण व्हावी तर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विविध क्रिडा प्रकारांची माहिती अशा एक ना अनेक उद्देशातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लाठी-काठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत असलेला हा एक प्राचीन मर्दानी खेळ. स्वसंरक्षण व शत्रूवर हल्ला करणे यातून लाठी फिरवण्याच्या कल्पनेचा उगम झाला. 

 “मन, मेंदू आणि मनगट यांच्यामध्ये साहस निर्माण करण्याचे असेल तर मुला-मुलींनी मैदानात उतरलेच पाहिजे. शिवकालीन शस्त्रास्त्र खेळाचे प्रशिक्षण आपल्या मुलांना नेहमीच स्व-रक्षणासाठी महत्वपूर्ण आहेत असे मार्गदर्शन छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान तुमसर चे संस्थापक अध्यक्ष इंजि. नितिन धांडे यांनी केले. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य श्री. दिलीपभाऊ सार्वे उपस्थिती होते, मार्गदर्शक उपासरवजी सोनवाणे, आकाशजी सोनवाणे, बंटीभाऊ लील्हारे अध्यक्ष राजे प्रतिष्ठान देव्हाडी, छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान चे सचिव अमोल उमरकर, संपर्क प्रमुख कोमल वानखेडे, अंकुश गभणे, प्रज्वल बुधे, मयुर पुडके, गीतेश गानोरकर, मनीष गायधने, हौसिलालजी ठाकरे, संकेत बुधे, युवणेश धांडे, खुशी भोयर, पूजा सिंगंजुडे उपस्थित होते. 

परिसरातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने शिबिरात सहभागी होऊन सदर शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान करीत आहे.

Leave a Comment

loader-image
BHANDARA GONDIA
10:43 am, May 12, 2024
temperature icon 28°C
overcast clouds
Humidity 49 %
Pressure 1013 mb
Wind 9 Km/h
Wind Gust Wind Gust: 11 Km/h
Clouds Clouds: 100%
Visibility Visibility: 0 km
Sunrise Sunrise: 5:55 am
Sunset Sunset: 6:56 pm

Our Visitor

5 1 1 9 6 4
Total Users : 511964
Total views : 523739