Search
Close this search box.
जनसेवा हे माझे आद्य कर्तव्य ; जनतेला न्याय मिळवून देणे हीच माझी प्रमुख भूमिका – पंकज एस यादव “अवकाळीचे येणे दुष्काळात तेरावा महिना” रेल्वे ब्रीज का निर्माण कार्य ८ दिन में सुरु करे अन्यथा करेंगे आंदोलन – विधायक विनोद अग्रवाल प्रताप मेमोरियल चेरिटेबल द्वारा ट्रस्ट 10 मई को ग्राम कामठा में भव्य सर्वधर्म सामुहिक विवाह समारोह पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के संयोजन में विवाह की तैयारी शुरू आज हनुमान चालीस का पाठ पत्रकार अमृतलाल (लालु) चरडे यांची पदोन्नती मानवता को जिवित रखने के लिए रक्तदान जरुरी- रक्तदूत प्रीतम राजाभोज.. करडी मुंढरी रस्त्याचे काम कासव गतीने कलार समाज भोपाल के 18 वे स्थापना दिवस समारोह संपन्न सामान्य कावीळ साठी नवजात बालकांना ‘रेफर टू भंडारा’ वैद्यकिय अधीक्षकांचे दुर्लक्ष 
1710993667408
WhatsApp Image 2024-04-12 at 10.41.57_8c08aba1
1710994486762
WhatsApp Image 2024-02-29 at 17.04.28_6ab901dd
mamacha
WhatsApp Image 2023-08-31 at 00.27.18
IMG-20231030-WA0012

लातूर शहरातील स्फोट प्रकरणाची माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्याकडून चौकशी

जखमी मुलावर तातडीने आवश्यक ते उपचार करण्यासंबंधी डॉक्टरांना सूचना

भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत यासाठी महापालिका प्रशासनाने दक्षता घ्यावी

उपसंपादक / राठोड रमेश पंडित 

लातूर:- रविवारी सायंकाळी लातूर शहरातील तावरजा कॉलनी भागात फुगे विक्रेत्याच्या सिलेंडरचा स्फोट होऊन एक जनाचा मृत्यू तर जवळपास दहा मुले जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे, सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच २ खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांशी तातडीने संपर्क साधून जखमींच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली, त्यांच्यावर आवश्यक ते उपचार करण्याचा सूचना दिल्या आहेत, 

सदरील घटनेत फुगे विक्रेत्याचा जागीच मृत्यू झाला तर इतर दहा मुले जखमी झाली आहेत, यातील आठ मुले शासकीय रुग्णालयात तर स्पर्श आणि गॅलक्सी रुग्णालयात प्रत्येकी एक मुल उपचारासाठी दाखल झाले आहे. सदरील घटनेची माहिती मिळतात आमदार अमित देशमुख यांनी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अध्यक्ष ऍड किरण जाधव व सहकार्यांना घटनास्थळी तसेच जखमी लहान मुले उपचारासाठी दाखल झालेल्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि स्पर्श व गॅलक्सी या खाजगी रुग्णालयात पाठवून, जखमींना व त्यांच्या कुटुंबियांना आवश्यक ती मदत पुरवण्यासंबंधी सांगितले आहे. ॲड किरण जाधव यांनी तिन्ही रुग्णालयात जाऊन जखमींची तसेच त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारा संबंधी माहिती घेतली, सदरील माहिती त्यांनी आमदार अमित विलासराव देशमुख यांना अवगत केले आहे, आमदार देशमुख यांनी हे डॉक्टरांशी बोलून जखमी मुलांवर योग्य ते उपचार करण्यासंबंधी सूचना केल्या आहेत

या घटनेनंतर माजी मंत्री आमदार देशमुख यांनी लातूर महापालिका प्रशासनाशीही संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली.

सुरक्षेची काळजी न घेता विनापरवाना शहरात फिरणाऱ्या विक्रत्यांना महानगरपालिकेने प्रतिबंध करावा. यापुढे असे प्रकार घडणार नाहीत या दृष्टीने काळजी घ्यावी अशा सूचनाही त्यांनी लातूर मनपा अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Leave a Comment

loader-image
BHANDARA GONDIA
1:12 am, May 11, 2024
temperature icon 31°C
few clouds
Humidity 44 %
Pressure 1009 mb
Wind 9 Km/h
Wind Gust Wind Gust: 12 Km/h
Clouds Clouds: 11%
Visibility Visibility: 0 km
Sunrise Sunrise: 5:56 am
Sunset Sunset: 6:56 pm

Our Visitor

5 1 1 8 0 2
Total Users : 511802
Total views : 523472