Search
Close this search box.
BREAKING NEWS
छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान, तुमसर च्या वतीने आयोजित शिवकालीन मैदानी खेळांचे मोफत प्रशिक्षण आणि बालसंस्कार शिबिराला सुरवात पत्रकार अमृतलाल (लालु) चरडे यांची भंडारा जिल्हा सहसंघटक पदी नियुक्ती पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में प्रतिवर्षानुसार अक्षयतृतिया 10 मई 2024 को ग्राम कामठा में भव्य सर्वधर्म सामुहिक विवाह समारोह गोठनपार घटना के हत्यारों को फाँसी की सजा दें – विधायक विनोद अग्रवाल इनकी मांग अवकाळी पावसामुळे नुकसान ग्रस्ताचे तत्काळ पंचनामे करा, शासनाने नुकसान भरपाई द्यावी तुमसर पोस्ट ऑफिसमध्ये ग्राहकांना असभ्य वागणूक ग्राहकाला मारहाण करण्याचा प्रयत्न 
छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान, तुमसर च्या वतीने आयोजित शिवकालीन मैदानी खेळांचे मोफत प्रशिक्षण आणि बालसंस्कार शिबिराला सुरवात पत्रकार अमृतलाल (लालु) चरडे यांची भंडारा जिल्हा सहसंघटक पदी नियुक्ती पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में प्रतिवर्षानुसार अक्षयतृतिया 10 मई 2024 को ग्राम कामठा में भव्य सर्वधर्म सामुहिक विवाह समारोह गोठनपार घटना के हत्यारों को फाँसी की सजा दें – विधायक विनोद अग्रवाल इनकी मांग अवकाळी पावसामुळे नुकसान ग्रस्ताचे तत्काळ पंचनामे करा, शासनाने नुकसान भरपाई द्यावी तुमसर पोस्ट ऑफिसमध्ये ग्राहकांना असभ्य वागणूक ग्राहकाला मारहाण करण्याचा प्रयत्न  छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान, तुमसर च्या वतीने आयोजित बाल संस्कार शिबीर व शिवकालीन मैदानी खेळांचे मोफत प्रशिक्षण वैश्विक नेता श्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में भाजपा की सरकार बनेगी: राजाराम शिवहरे राष्ट्रीय निर्माण हेतु कमल का बटन दबाएं भाजपा को जिताएं- राजाराम शिवहरे श्री नरेंद्र मोदी को तीसरी बार प्रधानमंत्री बनाकर भारत को विश्व गुरु बनाना है राजाराम शिवहरे
1710993667408
WhatsApp Image 2024-04-12 at 10.41.57_8c08aba1
1710994486762
WhatsApp Image 2024-04-12 at 10.42.16_9ca483d9
WhatsApp Image 2024-02-29 at 17.04.28_6ab901dd
IMG-20231030-WA0012
WhatsApp Image 2023-08-31 at 00.27.18

विकासाची भूमिका घेऊनच योग्य निर्णय – खा प्रफुल पटेल

प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने

मेळाव्याला श्री पटेलांचे उत्स्फूर्तपणे जंगी स्वागत

आज राष्ट्रवादीचा एकच ध्यास वर्धा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास संकल्पनेतून, दादाजी धुनिवाले सभागृह वर्धा येथे आयोजित पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा परिवर्तन मेळावा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष तथा खासदार श्री प्रफुल पटेल, माजी मंत्री श्री सुबोध मोहिते, युवक प्रदेश अध्यक्ष श्री सूरज चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला. 2 महिन्यापूर्वी जो निर्णय घेण्यात आला तो सर्वसामान्य जनेतच्या सर्वांगीण विकासाची भूमिका घेऊनच योग्य निर्णय घेण्यात आला असे मेळाव्याला संबोधित करताना श्री पटेल बोलत होते.

यावेळी बोलताना श्री प्रफुल पटेल यांनी सत्तेत सहभागी होण्याची भूमिका मांडली. ४३ आमदारांचे लाभलेले बळ, पक्षाची मान्यता व चिन्ह अबाधित राहील, अशी ग्वाही देत मनातील किंतु-परंतु दूर करण्याचे आवाहन कार्यकत्यांना केले. आपल्या पक्षाला आतापर्यंत कसे दुय्यम स्थान मिळत गेले, याचाही उल्लेख त्यांनी केला. शिवसेनेचे ५६ आणि आपले ५४ होते. याआधारे अडीच नाही तर किमान दोन वर्षे राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद अपेक्षित होते. त्यावेळी मात्र कुणीही यावर बोलले नाही. राष्ट्रवादीला अनेकवेळा संधी आली. मात्र प्रत्येकवेळी आपण संधी गमावली. काँग्रेसने सुरुवातीपासून झुकते माप घेतले व आपल्याला ठराविक झागा दिल्या. प्रत्येकवेळी आम्ही माघार घ्यायची का, पहिल्या क्रमांकावर येण्याची आशा बाळगायची नाही का’, असे सवाल करून ‘भाजपकडून पूर्ण न्याय मिळणार आहे. यापुढे आपला पक्ष अधिक बळकट करू’ असे प्रतिपादन श्री पटेल यांनी केले.

श्री पटेल पुढे म्हणाले की, ‘पक्षाचे नाव, चिन्ह मिळेल की नाही, याची चिंता करू नका. आपल्यासोबत ४३ आमदार आहेत आणखी येतील. बहुसंख्य कार्यकर्ते सोबत आहेत. त्यामुळे निवडणूक आयोग योग्य निर्णय घेईल’, असे पटेल म्हणाले. यावेळी कार्यकर्त्यांनी वर्धा जिल्ह्यात परिवर्तन मेळाव्याच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस चा विस्तार व अधिक बळकट करण्याची ग्वाही दिली.

मेळाव्याला खासदार श्री प्रफुल पटेल यांच्यासोबत श्री सुबोध मोहिते, श्री सुरज चव्हाण, श्री ईश्वर बाळबुधे, श्री प्रशांत पवार, श्री बाबा गुजर, मेधाताई पवार, श्री पुंडलिक पांडे, श्री शरद सहारे, श्री आशिष ठाकरे, श्री मयूर डफके, श्री रोशन तेलंग, क्रांतीताई धोटे, श्री दिलीप पोटफोडे, श्री उज्वल काशीकर सहीत असंख्य पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ता व पत्रकार बंधू उपस्थित होते.

Leave a Comment

loader-image
BHANDARA GONDIA
5:58 am, Apr 29, 2024
temperature icon 29°C
clear sky
Humidity 35 %
Pressure 1009 mb
Wind 14 Km/h
Wind Gust Wind Gust: 29 Km/h
Clouds Clouds: 0%
Visibility Visibility: 0 km
Sunrise Sunrise: 6:02 am
Sunset Sunset: 6:51 pm

Our Visitor

5 1 1 1 6 7
Total Users : 511167
Total views : 522526

Our Visitor

5 1 1 1 6 7
Total Users : 511167
Total views : 522526