पालकमंत्री महोदय जिल्ह्यातील बांधकाम,कृषी आणि इतर विभागातील भ्रष्टाचार थांबवा अन्यथा आंदोलन छेडू- चरण वाघमारे
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने भंडारा- भंडारा जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागातील, कृषी विभागातील व इतर विविध विभागाअंतर्गत होत असलेला गैरप्रकार तत्काळ थांबविण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा भारत राष्ट्र समिती पक्षाचे नेते माजी आमदार चरण वाघमारे यांनी पत्र परिषदेत दिला आहे. सविस्तर माहिती अशी आहे की, १) जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जवळपास दीडशे…