तुमसर शहरात सात दुकानांची चोरी – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिष्टमंडळाचे पोलीस ठाण्यात निवेदन
इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ तुमसर प्रतिनिधि तुमसर: शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात दिनांक २२ जून रोजी रात्रीच्या वेळेस एकाच वेळी सात दुकाने फोडून चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण व्यापारी वसाहतीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, काही दुकानांतून रोख रक्कम, मोबाइल, किराणा साहित्य, कपडे आणि इलेक्ट्रॉनिक…