पंकज रहांगडाले यांच्या पुढाकाराने गोंदिया जिल्ह्यात अंगणवाडीत नर्सरी ते KG शिक्षणाचा नाविन्यपूर्ण प्रयोग यशस्वी, प्रायोगिक उपक्रमाला हिरवा कंदील
गोंदिया / प्रतिनिधी : अंगणवाडीमध्ये विविध वयोगटातील बालकांना शिक्षण देताना त्यांच्या बुद्धीक्षमतेचा विचार करून शिक्षणाची पद्धत बदलण्याचा एक नाविन्यपूर्ण प्रयोग गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी त्यांच्या तुमखेडा बु. गावात राबवला आहे. या प्रयोगाच्या यशस्वीतेच्या पार्श्वभूमीवर, हा उपक्रम जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात किमान १० शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबवावा, अशी मागणी रहांगडाले यांनी जिल्हा परिषदेच्या…