तुमसर पोस्ट ऑफिसमध्ये पार्सलचा खच, ग्राहकांची दमछाक! पोस्ट निरीक्षक अनुपस्थित
तुमसर :तुमसर शहरातील मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये सोमवारी झालेली घडामोड ही अक्षरशः “सेवेसाठी आले आणि त्रास घेऊन परत गेले” अशी ठरली. संपूर्ण कार्यालयात पार्सलच्या गठ्ठ्यांचा एवढा खच पडला होता की, ग्राहकांना चालायला, उभं राहायला, आणि काउंटरपर्यंत पोहोचायलाही जागा उरली नव्हती. पोस्टाच्या हॉलमध्ये पार्सल्स काउंटरजवळ व ग्राहकांच्या वाटेवर रचून ठेवले होते. त्यामुळे वयोवृद्ध, महिला, आणि दिव्यांग ग्राहकांना…