हमसफर एक्सप्रेसने पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना बसवले नागपूरऐवजी अजनीवर; “रेल्वेच्या हलगर्जीमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय – रेल मंत्रालयाकडे तक्रार दाखल”
तुमसर :रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जी कारभारामुळे नागपूरहून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले आहे. नागपूर स्थानकावरून सुटणारी हमसफर एक्सप्रेस (गाडी क्रमांक 22142) अचानकपणे अजनी स्थानकावरून सोडण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांची व्यवस्था करून नागपूरहून अजनीपर्यंत प्रवास करावा लागला. तक्रारदार अनिल वासुदेव कारेमोरे (वय 52) यांच्यासह एकूण पाच प्रवाश्यांनी 3rd ए सी चे रिजर्वेशन केले…